वॉश्गिंटन, 26 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban)अफगाणिस्तानाचा (Afghanistan) ताबा घेतल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि लोकांना कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर पडायचं आहे. यासाठी, बहुतेक लोक काबूल विमानतळावर (Kabul Airport) जमा झाले. विमानतळावर सद्यपरिस्थितीत जवळपास अडीच लाखांहून नागरिक उपस्थित आहेत. मात्र या दरम्यान अमेरिकेने मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. विमानतळाच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं. काबूल विमानतळाद्वारे लोकांना देशातून बाहेर काढले जात आहे. (US Warns Terror Attack at Kabul Airport)काबूलमध्ये (Kabul) असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hamid Karzai International Airport) दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढल्यानं अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि काबूल विमानतळावर न जाण्याचा इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी लोकांना काबूल विमानतळावरून प्रवास करण्यापासून सावध केलं आहे. तालिबानकडून पत्रकाराची हत्या नाही तर मारहाण, Tweet करुन दिली माहिती अमेरिकेने अलर्ट जारी करत म्हटलं की, काबूल विमानतळाबाहेर असलेल्या धोक्यामुळे अमेरिकन नागरिकांनी विमानतळावर जाणं टाळावं. याशिवाय, लोकांनी विमानतळाच्या गेटवर जाणे देखील टाळावे. पुढील सुचना येईपर्यंत नागरिकांनी या सूचनेचं पालन करावं. जे नागरिक एबी गेट, ईस्ट गेट किंवा विमानतळाच्या नॉर्थ गेटवर आहेत, त्यांनी त्वरित निघून जावे. काबूलमधून आतापर्यंत हजारो लोकांना बाहेर काढलं अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाल्यापासून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि भारतासह अनेक देश काबुलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न करत आहेत. 14 ऑगस्टपासून काबूल विमानतळावरून लोकांचं एअरलिफ्ट सुरु आहे. आतापर्यंत काबूल विमानतळावरून 80,000 हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे.