JOIN US
मराठी बातम्या / विदेश / काबूल विमानतळावर जाणाऱ्या लोकांवर तालिबानकडून AK47 नं गोळीबार, हवेत फायरिंग; अमेरिकेकडून 7 हजार नागरिकांचं एअरलिफ्ट

काबूल विमानतळावर जाणाऱ्या लोकांवर तालिबानकडून AK47 नं गोळीबार, हवेत फायरिंग; अमेरिकेकडून 7 हजार नागरिकांचं एअरलिफ्ट

Afghanistan Crisis Kabul Airport Firing: अफगाणिस्तान सोडण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. अशातच एक बातमी समोर आली आहे. देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांवर तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

जाहिरात

तालिबानला केवळ महिलांचाच नाही तर शिक्षणाचाही आहे तिटकारा?, जाणून घ्या सत्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 20 ऑगस्ट: Afghanistan Crisis: अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर परिस्थिती भयानक आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. अशातच एक बातमी समोर आली आहे. देश सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांवर तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. असे सांगितले जात आहे की काबूल विमानतळावर (Kabul Airport) जाण्यापासून रोखण्यासाठी तालिबान हवेत गोळीबार करत असून AK 47 नं लोकांना ठार करत आहेत. वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, लोकांकडे आवश्यक कागदपत्रे असूनही, तालिबान त्यांना काबूल विमानतळावर प्रवेश करण्यापासून रोखत आहे. यासाठी ते लोकांना AK 47 ने मारत असून हवेत गोळीबार करत आहे. स्वातंत्र्यदिनीच तालिबान विरोधात लोकं रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरात निदर्शने सतत परिस्थिती बिघडत आहे रेडिओ न्यूझीलंड (RNZ) ने एका व्यक्तीच्या हवाल्यानं म्हटलं आहे, हे खूप वाईट आहे. तालिबानकडून हवेत गोळीबार करण्यात येत होता. ते लोकांना धक्के देत होते आणि त्यांना AK47 नं ठार करत होता. अमेरिकेकडून 7 हजार लोकांचं एअरलिफ्ट अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी सांगितले की त्यांनी सुमारे 7 हजार लोकांना एअरलिफ्ट केले आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता जगातील अनेक देश आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक! हुंड्यासाठी खासदाराकडून सुनेचा छळ, गुन्हा दाखल   अफगाण नागरिकांची निदर्शने अफगाणिस्तानमध्ये लोकं रस्त्यावर उतरुन तालिबानचा निषेध (Prohibition) करताना दिसाहेत. लोकं तालिबानच्या विरोधात निदर्शने (Protest) करताना दिसत आहेत. राजधानी काबूलसह अफगाणिस्तानातील अनेक शहरांमध्ये लोकं निदर्शने करत आहेत. तसंच या लोकांना समजावण्यासाठी तालिबान देशातील इमामांचीही मदत घेतानाही दिसत आहेत. नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक गोत्यात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी सर्व लोकांना एकत्रित रहायला सांगण्यात यावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. गुरुवारी तालिबानी दहशतवाद्यांनी कुनार प्रांतातील असदाबाद येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याचं तेथे उपस्थित असलेले लोकं सांगत असल्याचंही रॉयटर्सचं वृत्त आहे. दरम्यान लोकांचा जीव गोळीबारात गेला, की चेंगराचेंगरीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या