नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : जर तुम्ही ईशान्येला (नॉर्थ-ईस्ट) जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेचा उपक्रम आयआरसीटीसीने (IRCTC) एक अतिशय आलिशान आणि किफायतशीर ट्रेन टूर पॅकेज आणलं आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी, मलिनॉन्ग, मौसिनराम आणि गुवाहाटी येथे जाण्याची संधी मिळेल. आयआरसीटीसीने आपल्या ट्विटर हँडलवरून या रेल्वे टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजच्या बुकिंगसाठी, प्रवासी IRCTC वेबसाइट www.irctctourism.com ला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात. तसेच आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर आणि प्रादेशिक कार्यालयांद्वारे बुकिंग करता येते. हावडा येथून पॅकेजची सुरुवात हा संपूर्ण प्रवास 9 दिवस आणि 8 रात्रीचा असेल. हे पॅकेज हावडा येथून सुरू होईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची सुविधाही मिळेल. न्याहारी आणि रात्रीचे जेवण देखील पॅकेजमध्येच समाविष्ट केले जाईल. याशिवाय हॉटेलमध्ये राहण्याची सोयही केली जाणार आहे.
पॅकेजची सुरुवातीची किंमत रु. 27,810 आहे पॅकेजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कम्फर्ट क्लासमध्ये 6 लोकांनी एकत्र बुक केल्यास, प्रति व्यक्ती किंमत 27,810 रुपये आहे. 4 जणांनी एकत्र बुकिंग केल्यास प्रति व्यक्ती 32060 रुपये खर्च येतो. ट्रिपल ऑक्यूपेन्सीवर प्रति व्यक्ती खर्च 31,650 रुपये आहे आणि डबल ऑक्यूपेन्सीवर प्रति व्यक्ती 40,170 रुपये आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी एका बेडसह 14,610 रुपये शुल्क आहे. वाचा - Money Mantra: आज लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण केलंत तर व्हाल मालामाल टूर पॅकेज तपशील पॅकेजचे नाव- मॅजेस्टिक नॉर्थ ईस्ट रेल्वे टूर पॅकेज एक्स. हावडा (Majestic North East Rail Tour Package Ex. Howrah) डेस्टिनेशन कव्हर- शिलाँग, चेरापुंजी, मल्लिनॉन्ग, मौसिनराम आणि गुवाहाटी टूर कालावधी - 9 दिवस / 8 रात्री जेवण योजना - नाश्ता आणि रात्रीचे जेवण प्रवास मोड - रेल्वे वर्ग- 3AC फ्रीक्वेंसी - दर शुक्रवारी सुटण्याची वेळ- हावडा स्टेशन 11:20 AM