JOIN US
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / भारीच! विमानाचं तिकीट अवघ्या 1199 रुपयांना; ही भन्नाट ऑफर नक्की आहे तरी काय? वाचा

भारीच! विमानाचं तिकीट अवघ्या 1199 रुपयांना; ही भन्नाट ऑफर नक्की आहे तरी काय? वाचा

विमान सेवा कंपनी इंडिगोनं नुकतीच प्रवाशांसाठी तिकिटाच्या किंमतीवर सवलत देणारी ऑफर जाहीर केल्यानंतर आता आणखी एका विमान कंपनीनं तिकिटावर सवलतीची खास ऑफर आणलीय

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी: विमानात एकदातरी बसायची इच्छा अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला असते. विमानातील आरामदायी प्रवास, त्यामध्ये मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा प्रत्येकाला एकदातरी अनुभवायच्या असतात. पूर्वी केवळ श्रीमंत व्यक्तींसाठी असणारा विमानाचा प्रवास आता या क्षेत्रामध्येही वाढत असलेल्या स्पर्धेमध्ये सामान्य नागरिकांच्याही आवाक्यात येऊ लागलाय. त्यातच आता विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकिटाच्या किंमतीवर विविध सवलती देण्यात येऊ लागल्यानं विमानात बसण्याचं स्वप्न सहजासहजी पूर्ण होतंय. विमान सेवा कंपनी इंडिगोनं नुकतीच प्रवाशांसाठी तिकिटाच्या किंमतीवर सवलत देणारी ऑफर जाहीर केल्यानंतर आता आणखी एका विमान कंपनीनं तिकिटावर सवलतीची खास ऑफर आणलीय. ‘एबीपी लाईव्ह’ने याबाबत वृत्त दिलंय. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेकजण फिरायला जातात. देश-विदेशात वेगवेगळ्या भागांत पर्यटनासाठी जातात. त्यामुळे या काळात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी गो फर्स्ट या विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, प्रवासी 1,199 रुपयांमध्ये देशांतर्गत आणि 6,139 रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतात. ही ऑफर काल, गुरुवारी (23 फेब्रुवारी 2023) रोजी सुरू झाली असून प्रवाशांना 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत तिचा लाभ घेऊन बुकिंग करता येईल. याचाच अर्थ, आज या ऑफर अंतर्गत बुकिंग करण्याची शेवटची संधी आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोनेही अशीच ऑफर नुकतीच जाहीर केलीय. प्रवास कधी करता येईल? गो फर्स्ट कंपनीच्या ऑफर अंतर्गत 12 मार्च ते 30 सप्टेंबर 2023 या काळातील प्रवासाचं तिकीट बुकिंग करता येतील. अशा परिस्थितीत ज्यांचं या काळात प्रवासाचं नियोजन आहे, व त्यांना या सवलतींचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ऑफर अंतर्गत तिकीट बुकिंग करण्यासाठी आज, शुक्रवारी शेवटची संधी आहे. तर, इंडिगोनं 13 मार्च ते 13 ऑक्टोबर या कालावधीतील प्रवासासाठी 2,093 रुपयांपासून पुढे देशांतर्गत विमान तिकिटे ऑफर केली आहेत. 25 फेब्रुवारीपर्यंत ही तिकीट विक्री सुरू राहणार असल्याची माहिती इंडिगोनं त्यांच्या वेबसाइटवर आणि ट्विटरवर दिली आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तिकीट बुक करण्यासाठी उद्या, शनिवारी (25 फेब्रुवारी 2023) शेवटची मुदत आहे. यासोबतच तिकीटाच्या विक्रीदरम्यान काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली असून ते पाळणं अनिवार्य असेल. दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही गो फर्स्ट किंवा इंडिगो कंपनीनं दिलेल्या ऑफरचा लाभ घेऊन विमानाच्या तिकीटाची बुकिंग करू शकता. त्यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या