file photo
अमित सिंह, प्रतिनिधी प्रयागराज, 17 जून : जर तुम्ही राहुल सांकृत्यायनच्या “घुमक्कड़ों अथातो जिज्ञासा” या गाण्याने प्रभावित असाल आणि तुम्हाला नवीन ठिकाणी जायची आवड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उत्तर मध्य रेल्वे दक्षिण भारताच्या ट्रीपवर एक उत्तम पॅकेज देत आहे. विशेष म्हणजे फक्त एक हजार रुपये भरून तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात. कारण रेल्वेकडून ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे. दक्षिण भारतात तुम्हाला सुंदर पर्वतं, समुद्र किनारे, जंगले फिरायला मिळेल. इतकेच नव्हे तर सुंदर ऐतिहासिक मंदिरांना भेटी द्यायला मिळेल.
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bhart Gaurav Tourists Train) प्रवाशांना दक्षिण भारताच्या ट्रीपवर घेऊन जाईल. ही ट्रेन प्रयागराज जंक्शनवरही पोहोचेल. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील डीआरएम हिमांशू बदाउनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bhart Gaurav Tourists Train) ही 10 जुलै रोजी दुपारी 12:05 वाजता ऋषिकेश स्थानकावरून निघेल. 10 जुलैपासून सुरू होणार यात्रा - ही रेल्वे हरिद्वार, मुरादाबाद, बरेली, शाहजहांपूर, हरदोई, लखनौ, रायबरेली, प्रतापगड मार्गे दुपारी 1:51-2:01 वाजता प्रयागराजला पोहोचेल. यासाठी स्लीपर क्लासचे भाडे 20,870 रुपये असेल. ही ट्रेन तुम्हाला दक्षिण भारतातील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, तिरुपती बालाजी, रामेश्वरम, मीनाक्षी मंदिर मदुराई, कन्याकुमारी येथे भेट देण्यासाठी घेऊन जाईल. 10 जुलैपासून सुरू होणारा हा दहा दिवसांचा प्रवास 20 जुलैपर्यंत आहे. EMI वर मिळतील तिकिटे - या ट्रीपसाठी प्रवाशी एकाच वेळी पूर्ण रक्कम न भरता EMI वरही तिकीटे मिळवू शकतात. यासाठी 1,022 रुपये प्रति महिना ईएमआय भरावा लागेल. हे तिकिट प्रवाशी IRCTC पोर्टलवर आणि सरकारी आणि गैर-सरकारी बँकांमधून घेतले जाऊ शकते. यामध्ये नास्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण शाकाहारी भोजन आणि नॉन एसी हॉटेल्समध्ये राहणे आणि स्थानिक वाहतूक यांचाही या प्रवास भाड्यात समावेश आहे. allahabadतर एसी II प्रवाशांसाठी एसी रूम आणि एसी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे बुकिंग IRCTC वेबसाइट आणि प्रयागराज जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या IRCTC कार्यालयातून केले जाऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.