मुंबई, 6 सप्टेंबर : इंटरनेट (Internet) ही आता जवळपास प्रत्येकाची गरज बनली आहे. अलीकडच्या काळात बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी इंटरनेटचा वापर होतोच, पण आता घरातही इंटरनेट वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. बहुतांश लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहण्यासाठी, तसंच विविध प्रकारची कामं ऑनलाइन माध्यमातून करण्यासाठी स्मार्टफोनवर इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे काही वेळा घराबाहेर असताना इंटरनेट डाटा (Data) संपतो. अशा वेळी रिचार्ज करणं शक्य नसेल तर आपण इंटरनेटसाठी काही पर्याय शोधू लागतो किंवा मित्र अथवा एखाद्या व्यक्तीकडं हॉटस्पॉट (Hotspot) मागतो. पण डाटा पॅक संपलं तरी तुम्ही फ्री इंटरनेटचा (Free Internet) लाभ घेऊ शकता. यासाठी काही खास ट्रिक आहेत. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. घराबाहेर किंवा महत्त्वाच्या कामात असताना डाटा पॅक संपलं तर अडचण निर्माण होते. अशावेळी आपण फ्री वाय-फाय (Free WiFi) किंवा हॉटस्पॉट सुविधेचा शोध घेऊ लागतो. मात्र काही ट्रिकच्या मदतीनं आपण अडचणीच्यावेळी फ्री इंटरनेट वापरू शकतो. फेसबुकच्या (Facebook) फ्री वायफाय सेवाच्या माध्यमातून आपण फ्री इंटरनेट वापरता येतं. याशिवाय काही टेलिकॉम कंपन्या फ्री डाटा उपलब्ध करून देतात. जर तुम्ही टेलिकॉम कंपनीच्या आधिकृत अॅपवरून रिचार्ज करत असाल तर एअरटेल (Airtel) 359 रुपयांवरील सर्व रिचार्जवर 1GBची दोन कूपन देतं. तसंच 479 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं रिचार्ज केल्यास युजर्सना 1GB ची चार कूपन मिळतात. जिओ आणि व्होडाफोन आयडियादेखील वेगवेगळ्या डाटा प्लॅन ऑफर्स आहेत. युजर्स फेसबुकच्या माध्यमातून फ्री इंटरनेट वापरू शकतात. फेसबुकनं दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक बिझनेससाठी वायफाय हॉटस्पॉट असतात आणि त्या माध्यमातून ते पडताळणीदेखील करतात. हे वाय-फाय वापरण्यायोग्य असतात आणि बहुतांश वेळा ही सुविधा फ्री असते. फेसबुककडं वाय-फाय फाउंडर नेटवर्क (Wifi Founder Network) आहे. या नेटवर्कच्या मदतीनं तुम्ही फ्री इंटरनेटचा वापर करू शकता. हे फिचर फेसबुकमध्ये असतं. या फीचरला सीक्रेट टूल म्हटलं जातं. विशेष म्हणजे अॅण्ड्रॉईड आणि आयओएस असे दोन्ही यूजर्स त्याचा वापर करू शकतात. फ्री इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम फेसबुक अॅप ओपन करावं लागेल आणि थ्री-लाइन मेन्यू बटणावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेटिंग्ज अँड प्रायव्हसी ऑप्शनवर जावं. तिथून Find WiFi ऑप्शनमध्ये जावं लागेल. त्यानंतर फेसबुक तुम्हाला तुमच्या आसपासच्या पब्लिक वाय-फाय हॉटस्पॉटची (Public Wifi Hotspot) माहिती देईल. तसेच त्यात मॅप आणि लोकेशन या दोन्हींची माहिती स्पष्टपणे मिळेल. त्यानंतर तुम्ही See More ऑप्शनवर गेल्यास वाय-फाय हॉटस्पॉट विषयी सविस्तर माहिती मिळेल. तसंच इथं तुम्हाला वाय-फायचं नाव आणि स्पीडची माहिती मिळेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं कसं याचं डायरेक्शन समजेल. प्रत्येक वायृफाय हॉटस्पॉट फ्री नसतात. काही पेड अर्थात सशुल्क असतात. तिथं तुम्हाला इंटरनेटसाठी शुल्क द्यावं लागतं. पण अडचणीच्या वेळी इंटरनेट उपलब्ध झाल्यानं तुमची कामं सोपी होतात.