नवी दिल्ली, 1 जानेवारी : Xiaomi चा नवा बहुचर्चित स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. Mi 10i फोन 5 जानेवारी रोजी भारतात लाँच होणार आहे. या फोनला Mi 10T Lite चं रीब्रँडेड वर्जन असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीही हा फोन कंपनीने सोशल मीडिया हँडलद्वारे टीज केला आहे. मात्र आता फोन लाँचला शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विटद्वारे कन्फर्म केलं आहे. या फोनची खास बाब याचा कॅमेरा असल्याचं बोललं जात आहे. Xiaomi Mi 10i फोनला 108 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे. फोनला 6.67 इंची डिस्प्ले असू शकतो. हा फोन मेड इन इंडिया असून भारतीय प्रोडक्ट टीमकडून बनवण्यात आला आहे.
फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. 108 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड एँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी फोनला 16 मेगापिक्सल कॅमेरा असल्याचं बोललं जात आहे. फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.