मुंबई, 9 सप्टेंबर : स्मार्टफोन (Smartphone) युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोन्ससोबत हेडफोन्स, वायरलेस हेडफोन्स किंवा इअरबड्स वापरण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या गोष्टींचा वापर खासकरून ड्रायव्हिंग करतेवेळी फायदेशीर ठरतो. आपल्यापैकी बहुतांश जण इयरफोन्सचा (Earphone) रोज वापर करतात. संगीताचा आनंद घेण्यासाठी किंवा कॉलवर बोलण्यासाठी इयरफोन्सचा वापर होतो. सध्या बाजारात विविध कंपन्याचे खास फीचर्स असलेले इयरफोन्स उपलब्ध आहेत. इयरफोन्स वापरणं सोपं असलं तरी त्याच्या वायरचा होणारा गुंता अनेकांसाठी डोकेदुखी ठरते. इयरफोन्स वापरून झाल्यावर बॅगमध्ये किंवा खिशात ठेवतो तेव्हा त्याच्या वायर्सचा गुंता होतो. त्यानंतर हा गुंता (Tangled) सोडवताना आपण मेटाकुटीला येतो. इयरफोन्स नीट न ठेवल्यामुळे अशी समस्या निर्माण होते, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. इयरफोन्सच्या वायरचा गुंता होण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. त्याला `नॉट थिअरी` (Knot Theory) असं म्हणतात. ही थिअरी गाठीचा सिद्धांत म्हणूनही ओळखली जाते. संशोधकांनी एक मजेदार प्रयोग करून हा गुंता कमी वेळात आणि सहजपणे कसा सोडवता येतो, हे दाखवून दिलं आहे. स्मार्टफोनसोबत आपण बऱ्याचदा इयरफोन्सचा वापर करतो. वापर संपल्यावर आपण इयरफोन्स ठेवून देतो. पुन्हा जेव्हा इयरफोन्सचा वापर करायची वेळ येते, तेव्हा त्याच्या वायर्सचा गुंता झालेला असतो. हा गुंता काढणं तसं खूप वेळखाऊ असतं. या समस्येमागे शास्त्रीय कारण आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (California University) दोन संशोधकांनी इयरफोन्सच्या वायर्सच्या होणाऱ्या गुंत्यावर संशोधन केलं. यासाठी 2012मध्ये या दोघांनी नॉट थिअरीचा अभ्यास केला. या अभ्यासावेळी त्यांनी एक मजेदार प्रयोग केला. त्यांनी वेगवेगळ्या लांबीच्या वायर्स घेतल्या आणि त्या एका डब्यात टाकून फिरवण्यास सुरुवात केली. संशोधकांनी हा डबा 5 ते 10 वेळा फिरवल्यानंतर 10 सेकंदांत इयरफोन्सच्या वायरचा गुंता आपोआप सुटल्याचं त्यांना दिसून आलं. वायरचा गुंता काढण्याच्या या प्रक्रियेत त्यांची लांबी आणि जाडीतही फरक पडतो. वायर जितकी लांब आणि मऊ असेल तितकी गाठ बसण्याची शक्यता अधिक असते, असं संशोधकांना दिसून आलं. इयरफोन्सच्या वायरचा गुंता होण्यामागे शास्त्रीय कारण असल्याचं या संशोधकांना दिसून आलं. यासाठी केलेल्या नॉट थिअरीच्या अभ्यासातून याविषयीची कारणं स्पष्ट झाली. नॉट थिअरी म्हणजेच गाठीचा सिद्धांत. याच आधारे संशोधकांनी इयरफोनच्या वायरचा गुंता केवळ 10 सेकंदांत सोडवला.