मुंबई, 31 जानेवारी : मेसेजेसची देवाण-घेवणा करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त टेक्स्ट मेसेजेसच नाही, तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोजचीही (Photos) अगदी सहजपणे देवाणघेवाण करता येते. आपल्या युझर्सना सतत काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या युझर्ससाठी असंच एक उपयुक्त फीचर आणलं आहे. आपण एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ (delete for everyone) हा ऑप्शन आधीच उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे कधी-कधी आपल्याला आलेला एखादा मेजेस आपण ओपन करून पाहण्यापूर्वीच समोरची व्यक्ती तो डिलीट करते. ही गोष्ट आपली उत्सुकता ताणणारी ठरते. कारण, समोरच्या व्यक्तीनं काय पाठवलं आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. असे डिलीट केलेले मेसेज पाहण्यासाठी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर (Google Play) ‘WAMR’ हे डब अॅप उपलब्ध आहे. डिलीट झालेले मेसेज या अॅपच्या मदतीनं पुन्हा पाहता येतात. मुंबईतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार;WhatsApp वापरत असाल तर आधी हा VIDEO पाहाच ‘drilens’द्वारे पब्लिश केलं गेलेलं हे अॅप अजूनही प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत 5 कोटींहून अधिक यूजर्सनी हे इन्स्टॉल (Install) केलं आहे; मात्र आता तज्ज्ञांनी या अॅपबद्दल वॉर्निंग (Warning) देण्यास सुरुवात केली आहे. या अॅपच्या वापरामुळे युझर्सची ऑनलाइन प्रायव्हसी (online privacy) धोक्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. WAMR कसं काम करतं? गुगल प्ले लिस्टमधल्या अधिकृत नोट्समध्ये असं नमूद केलं आहे की, WAMR अॅप इन्स्टॉल करण्यासाठी अँड्राइड 5 (Android 5) व्हर्जन किंवा त्यापेक्षा अॅडव्हान्स फोनची आवश्यकता आहे. अॅपचा साइझ 16 MB आहे. डेव्हलपरनं (Developer) स्पष्ट केल्यानुसार, व्हॉट्सअॅपसेचे मेसेजेस एनक्रिप्टेड (Encrypted) असतात. त्यामुळे WAMRला थेट व्हॉट्सअॅप चॅटमध्ये प्रवेश मिळत नाही; पण हे अॅप नोटिफिकेशन्सचा (Notifications) ट्रॅक ठेवतं. रिसिव्हरने पाहण्यापूर्वीच सेंडरने एखादा मेसेज डिलीट केला तरी WAMRकडे उपलब्ध असलेल्या नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये (Notification History) तो उपलब्ध असतो. याशिवाय, मेसेजसोबत एखादी मीडिया फाइल असेल आणि ती डिलिट केली असेल तरी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं. गुगल प्ले लिस्टिंगमधल्या नोट्समध्ये अॅपच्या काही मर्यादाही देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, चॅट कायमचं अर्काइव्ह केलं असेल तर WAMR काम करत नाही. चॅट अर्काइव्ह असल्यास कोणतीही नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत. तुमच्या अँड्राइड फोननं WAMRला किलं केल असल्यासही नोटिफिकेशन मिळणार नाही. याशिवाय सर्व बॅटरी ऑप्टिमायझेशन (Battery Optimization) सर्व्हिसमधून WAMR काढून टाकल्यानंतरच ते काम करतं. एक्सपर्ट्स WAMR बद्दल वॉर्निंग का देत आहेत? एका security newspaper ने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीतले (IICS) सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स (cybersecurity experts) या अॅपला धोकादायक मानतात. कारण हे अॅप वापरण्यासाठी मल्टिपल सेटिंग्जचा अॅक्सेस (multiple settings access) द्यावा लागतो. युजरने गॅलरी, नेटवर्क आणि नोटिफिकेशन्समध्ये अॅपला अॅक्सेस दिला, की डेटा लीक (Data Leak) होण्याचा धोका वाढतो. अहवालात असंही नमूद केलं आहे, की हे अॅप ‘मॅलिशियस’ नाही, परंतु त्याच्याकडे नोटिफिकेशन्सचा अॅक्सेस जात असल्याने कोणताही संवेदनशील डेटा लीक होऊ शकतो. WhatsApp वर येणार भन्नाट फीचर, मिळतील 2 नवे टॅब; असा होईल फायदा अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे, की या अॅपच्या वापरामुळे सिक्युरिटी रिस्क (security risk) वाढते. WAMR इन्स्टॉल करण्यासाठी एक्सटेन्सिव्ह परमिशन्स देणं आवश्यक आहे. त्यामुळे इतर अॅप्सद्वारे ऑपरेट केलेल्या डेटाच्या सिक्युरिटीशी तडजोड होऊ शकते. याशिवाय डिव्हाइसच्या मेमरीमध्ये स्टोअर केलेल्या फाइल्स, इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि युझरची कॉन्टॅक्ट लिस्टसुद्धा (contact list) लीक होऊ शकते.