JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिन असाल तर 'या' 5 चुका करू नका, नाहीतर खावी लागेल जेलची हवा

WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिन असाल तर 'या' 5 चुका करू नका, नाहीतर खावी लागेल जेलची हवा

WhatsApp ग्रुप अॅडमिन्सना काही अतिरिक्त विशेषाधिकार आणि जबाबदाऱ्या असतात. या स्थितीत कोणत्याही ग्रुपवर चुकीचे काम होत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटरची आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : आपल्यापैकी अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वापरतात. पण ते खबरदारीने वापरणं आवश्यक आहे. योग्य खबरदारी घेतली नाही, तर व्हॉट्सअ‍ॅप वापरणं धोकादायक ठरू शकतं. व्हॉट्सअ‍ॅप वापरताना तुम्हाला काही नियम माहीत असणं आवश्यक आहे, त्यातही तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन असाल तर जास्त सावधगिरी बाळगावी लागते. तुम्हीही जर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन असाल ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन्सना काही अतिरिक्त विशेषाधिकार असतात तसंच त्यांच्यावर जादाच्या जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे कोणत्याही ग्रुपमध्ये जर काही चुकीचं काम होत असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटरची असते. या संदर्भात नवभारत टाइम्सने वृत्त दिलंय. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल, तर तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर होणारे फोटो (Photo), व्हिडिओ (Video) किंवा कंटेंटची (Content) माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला ग्रुपमधील सदस्य शेअर करत असलेल्या माहितीबद्दल माहिती असायला हवी. तुमचं लक्ष नसेल आणि ग्रुपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम होत असेल, तर तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन्सनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबद्दल जाणून घ्या. देशविरोधी कंटेंट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कोणत्याही प्रकारचा देशविरोधी कंटेंट शेअर करू नये. असे केल्याने, ग्रुप अ‍ॅडमिन आणि कंटेंट शेअर करणाऱ्या दोघांनाही अटक केली जाऊ शकते. या प्रकरणात तुरुंगवासही (Jail) होऊ शकतो. हिंसा हिंसा ही वाईट असते. त्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला धमकावले असेल किंवा तुम्ही अ‍ॅडमिन असणाऱ्या ग्रुपमध्ये काही हिंसात्मक कृत्य झालं असेल तर त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं. या शिवाय कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा अपमान केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ जर एखाद्याने कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक फोटो त्याच्या संमतीशिवाय ग्रुपवर टाकला आणि ग्रुप अ‍ॅडमिन त्याबद्दल काहीच कारवाई करत नसेल, तर संबंधिताच्या तक्रारीनंतर कंटेंट शेअर करणाऱ्याला आणि अ‍ॅडमिनला तुरुंगवास होऊ शकतो. फेक न्यूज सरकार फेक न्यूजपासून (Fake News) सावध राहण्याचा सल्ला देतं. आपल्या देशात फेक न्यूज आणि फेक कंटेंटवर कडक बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने कडक कायदा तयार केला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फेक न्यूज पसरवणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात जावं लागू शकतं.   अश्लीलता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एखाद्या सदस्याने कोणत्याही प्रकारचा अश्लील मजकूर पाठवला आणि ग्रुप अ‍ॅडमिनने कोणतीही कारवाई केली नाही, तर त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागू शकते. कोणत्याही प्रकारचा अश्लील कंटेंट व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर करणं कायद्याच्या विरोधात आहे. तुम्हाला माहीत नसताना जर कुणी एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅड केलं असेल, किंवा अ‍ॅडमिन केलं असेल तर त्या ग्रुपबद्दल माहिती अवश्य घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या