प्रातिनिधिक फोटो
मेसेजेसची देवाणघेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर. व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही तर ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोजचीही अगदी सहजपणे देवाणघेवाण करते येते. त्यामुळे जगभरातले अब्जावधी नागरिक व्हॉट्सअॅपचा वापर करतात; मात्र काही वेळा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला फार त्रास होत असेल तर आपण त्या व्यक्तीला ब्लॉक करतो. असं केल्यास ब्लॉक्ड युजर तुम्हाला फोन किंवा मेसेज करू शकत नाही; पण कधी-कधी परिस्थिती या उलटही असू शकते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीनं ब्लॉक केलेलं असू शकतं. आपल्याला ब्लॉक केलेलं आहे की नाही, हे ओळखण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. व्हॉट्सअॅपमुळे आपल्या सर्वांचं जीवन खूप सोपं झालं आहे. मेसेजिंग अॅपचा वापर फोटो शेअर करण्यासाठी, लोकेशन पाठवण्यासाठी किंवा संपर्क पाठवण्यासाठीदेखील केला जातो; मात्र कधी-कधी व्हॉट्सअॅप हे छळवणुकीचंही माध्यम बनतं. ज्यांना आपण व्हॉट्सअॅपवर टाळू इच्छितो त्यांना ब्लॉक करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर कोणीही कोणालाही ब्लॉक करू शकतो. यामुळे ब्लॉक केलेला युझर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज किंवा कॉल करू शकत नाही; पण कल्पना करा जर आपल्या बाबतीतही असंच घडलं, म्हणजे आपल्याला कोणी ब्लॉक केलं असेल तर आपल्याला कसं कळेल की आपण ब्लॉक झालो आहोत. त्याबद्दल जाणून घेऊया. ( सेकंड हँड कार घेण्यापूर्वी या 4 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर म्हणाल नवीन परवडली असती ) तुम्हाला एखाद्याने ब्लॉक केलेलं असेल आणि तुम्ही त्या युझरला व्हॉट्सअॅप कॉल करण्याचा प्रयत्न केल्यास तिथे रिंगिंग स्टेटस दिसत नाही. याशिवाय, तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर बरेच दिवस एकच टिक दिसत असेल तर समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलेलं आहे, हे समजून जावं. व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करूनही तुम्ही ब्लॉक्ड आहात की नाही हे पडताळून बघू शकता. तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू शकत नसाल तर तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलेलं आहे, हे ओळखता येतं. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचं लास्ट सीन किंवा ऑनलाइन स्टेटस तुम्हाला दिसत नसल्यास तुम्ही ब्लॉक्ड आहात, याचं ते लक्षण असतं; मात्र प्रत्येक वेळी ही गोष्ट लागू होईलच असं नाही. कदाचित समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक न करता फक्त स्टेटसचं प्रायव्हसी सेटिंगही बदललेलं असू शकतं. आपण ब्लॉक्ड आहोत की नाही हे शोधण्याची वेळ येऊच नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने व्हॉट्सअॅपचा काळजीपूर्वक आणि योग्य वापर केला पाहिजे.