कनेक्ट करण्यासाठी अकाउंट सिलेक्ट करा आणि Done वर क्लिक करा.
नवी दिल्ली, 2 एप्रिल : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp सतत आपल्या युजर्ससाठी नवे अपडेट्स देत असतं. आता व्हॉट्सअॅपने खास महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षा, त्यांच्या समस्या लक्षात घेत एक नवं AI चॅट-बॉट लाँच केलं आहे. WhatsApp वर ‘बोल बहन’ या नावाने चॅट-बॉट (AI Chat bot Bol Behen) असणार आहे. WhatsApp वापरणाऱ्या महिला, तरुणी किशोरावस्थामध्ये होणारे शारीरिक बदल किंवा इतरही कोणतेही आरोग्यसंबंधी प्रश्न विचारू शकतात आणि त्यांची उत्तर मिळवू शकतात. WhatsApp ने आपल्या महिला युजर्सला हे फीचर देण्यासाठी Girl Effect शी भागीदारी केली आहे. हे चॅट-बॉट असं तयार करण्यात आलं आहे, की महिलांच्या आरोग्यासंबंधी सर्व माहिती, तसंच किशोरवयीन मुलीही असे मनातील प्रश्न विचारू शकतात, जे इतरांना विचारण्यास त्यांना संकोच वाटतो. इथे हव्या त्या टॉपिकवर त्या चॅट-बॉटवर आपल्या समस्यांचं, प्रश्नांचं उत्तर मिळवू शकतात.
या क्रमांकावर मिळेल ही सर्विस - बोल बहन (Bol Behen) चॅट-बॉटचा वापर करण्यासाठी WhatsApp महिला युजर्सला +917304496601 या क्रमांकावर Hi पाठवावं लागेल. त्यासाठी या लिंकवर (https://wa.me/917304496601) क्लिक करावं लागेल. हे चॅट-बॉट व्हॉट्सअॅप बिजनेस प्लॅटफॉर्मवर असून AI चॅट-बॉट हिंग्लिशमध्ये चोवीस तास उपलब्ध आहे. हे बोल बहन चॅट-बॉट भारतातील अशा महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी, तरुणींसाठी सेवा देण्यासाठी डिझाइन केलं गेलं आहे, जे सामान्यत: अत्यंत कमी किंवा मर्यादित इंटरनेटचा वापर करतात.
दरम्यान, व्हॉट्सअॅपनं काही जुन्या अँड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोन मॉडेल्समध्ये आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपासून काही अँड्रॉईड (Android), आयओएस (iOS) आणि कायओएस (KaiOS) व्हर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही.