नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : सगळ्या जगाला एका क्लिकवर माहिती मिळवून देणाऱ्या इंटरनेटशिवाय (Internet) जगण्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. इंटरनेट हा आता जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातील दररोज शब्द झाला आहे. इंटरनेट नसेल तर जगायचं कसं असा प्रश्नही आज अनेकांना पडतो. काहीतरी अपरिहार्य कारणाने काही वेळ किंवा एखादा दिवस इंटरनेटशिवाय घालवावा लागला, तर आपण सैरभैर होतो. चांगलं वेगवान इंटरनेट मिळण्यासाठी लोक वाटेल तेवढे पैसे खर्च करण्यास तयार आहेत. पण इंटरनेट म्हणजे नेमकं काय? ते कसं काम करतं याबाबत मात्र असंख्य लोक अनभिज्ञ आहेत. इंटरनेट म्हणजे नेमकं काय? इंटरनेट हा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा (Information Technology) अविष्कार आहे. तांत्रिकदृष्ट्या याची माहिती घ्यायची झाली, तर हे एक जागतिक स्तरावर जोडलेले नेटवर्क (Network) आहे जे TCP/IP वापरून अनेक माध्यमांद्वारे माहिती प्रसारित करतं. हे वायरलेस (Wireless) आणि फायबर-ऑप्टिक (Fibre Optic)तंत्रज्ञानाद्वारे जोडलेलं खासगी, सार्वजनिक, व्यवसाय, शैक्षणिक आणि सरकारी नेटवर्कवर आधारित जागतिक एक्सचेंजचं जाळं आहे. इंटरनेटवरील माहिती पाहण्यासाठी ब्राउजरची (Browser) आवश्यकता असते. त्याला आपण ‘क्लायंट अॅप्लिकेशन’ म्हणू शकतो. ब्राउजर वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाण्याचं स्वातंत्र्य देतो आणि वेबसाइटवरून तुम्हाला परत पाठवलेल्या डेटाला प्रतिसाद देतो. इंटरनेट सुरू राहण्यात सर्व्हरची (Server) खूप महत्वाची भूमिका असते. प्रत्येक सर्व्हरचा स्वतंत्र IP ADDRESS असतो.
उदाहरणार्थ, 180.181.33.62 हा सर्व्हरचा अॅड्रेस आहे. ब्राउजरद्वारे तुम्ही एखाद्या वेबसाइटसाठी विनंती करता, तेव्हा कुठेतरी तुमच्या ब्राउजरला त्याचा IP Address काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. ब्राउजर सापडताच, नंतर आपला ब्राउजर DNS डोमेन नेम सेवेशी संपर्क साधतो, येथे या URL चा IP Address दिसतो. हा IP ब्राउजरद्वारे मिळताच ब्राउजर सॉकेट कनेक्शनद्वारे सर्व्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. यानंतर, ज्या वेबसाइटबद्दल तुम्ही विनंती केली आहे ती उघडली जाते. ब्राउजर आणि सर्व्हरमध्ये एक ओपन कनेक्शन निर्माण होतं. त्यानंतर तुम्ही पाठवलेली रिक्वेस्ट आणि वेब सर्व्हरद्वारे पाठवलेली माहिती डेटा पॅकेटमध्ये वाटली जाते. तुम्ही फोटोसाठी विनंती केली, असेल तर डेटा छोट्या पॅकेटमध्ये तो विभागला जातो. त्याला टाइल (Tile) म्हटलं जातं. या टाइलला IP Address म्हणूनही पाहिलं जाऊ शकतं. अशा प्रकारे इंटरनेट कार्य करण्यास सुरवात करतं.
ब्राउजरला सर्व डेटा पॅकेट्स मिळताच, HTML, CCS, जावास्क्रिप्ट आणि इमेज फाईल्सच्या (Image) रूपात एक आर्टिकल स्वरूपात दिसतात. सर्व फाईल्सवर प्रक्रिया झाली की, तुम्ही ती तुमच्या ब्राउजर स्क्रीनवर पाहू शकता.