JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / असा एक AI बॉट जो लाखो लोकांना बेरोजगार करू शकतो आणि गुगलला सुद्धा मागे टाकू शकतो

असा एक AI बॉट जो लाखो लोकांना बेरोजगार करू शकतो आणि गुगलला सुद्धा मागे टाकू शकतो

AI चॅटबॉट आहे जो तुमच्या कोडमधील चुका शोधू शकतो किंवा तुमच्यासाठी कथा सुद्धा लिहू शकतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: ChatGPT म्हणून ओळखल्या जाणार्‍या AI बॉटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे पण ते नेमके काय आहे आणि ते कसं काम करत ? ChatGPT हा एक नवीन AI चॅटबॉट आहे जो तुमच्या कोडमधील चुका शोधू शकतो किंवा तुमच्यासाठी कथा सुद्धा लिहू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप सुधारणा झाली आहे आणि एक गोष्ट जी प्रचंड मोठी बनली आहे ती म्हणजे जनरेटिव्ह AI, जी तुम्ही इनपुट केलेला डेटा वापरते जसे की मजकूर आणि फोटो आणि त्याचा वापर करून तुम्हाला अधिक आउटपुट देते. OpenAI या कंपनीची स्थापना एलोन मस्क आणि सॅम अल्टमन यांनी केली होती नंतर मस्क यांनी राजीनामा दिला, पण आर्थिक गुंतवणूक कायम ठेवली. ChatGPT नक्की काय आहे ? OpenAI, या AI कंपनीने ChatGPT, कंपनीच्या नवीन GPT-3.5 नैसर्गिक भाषा निर्मिती तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉटची घोषणा केली आणि ते ३० नोव्हेंबरला लोकांसाठी रिलीज केलं. ओपनएआयने (OpenAI) ने यापूर्वी DALL-E (डॅल-ई) सादर केले होते, हे एक AI इमेज जनरेटर आहे जो तुम्हाला पाहिजे तशी इमेज तयार करून देतो. ChatGPT हे एक संभाषणात्मक संवाद मॉडेल आहे, जे नैसर्गिक मानवी भाषा समजून घेण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी AI आणि मशीन लर्निंगद्वारे काम करत त्याचे नाव GPT किंवा जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर वरून पडलं आहे , ते आपला मेंदू ज्याप्रमाणे शिकतो त्याचप्रमाणे हे AI चॅटबॉट शिकण्याचा प्रयत्न करत, आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेला मजकूर आणि साहित्य वाचून आणि मुख्य म्हणजे तो मजकूर समजून घेऊन तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतं. हे चॅटबॉट तुम्ही भूतकाळात विचारलेले प्रश्न लक्षात ठेवतं आणि जर तुम्ही एखादी त्याने एखादी केलेली चूक दाखवली तर त्यामध्ये स्वतः सुधार करत आणि वापरकर्त्यांच्या चुकीच्या विनंत्या नाकारण्याचं काम सुद्धा करत. ChatGPT कसे कार्य करते? ओपनएआयने (OpenAI) रिइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्यूमन फीडबॅक (RLHF) म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करून ChatGPT प्रशिक्षित केले. RLHF AI ला प्रशिक्षित करण्यासाठी पुरस्कार/शिक्षा प्रणाली वापरते. डीप लर्निंग ही एक मशीन लर्निंग पद्धत आहे ज्यामध्ये न्यूरल नेटवर्कचे तीन किंवा अधिक स्तर असतात. हे नेटवर्क मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याचा प्रयत्न करत आणि डेटा वापरून आपल्याप्रमाणे शिकतं. जेव्हा जेव्हा एआय काम करते तेव्हा ते बरोबर किंवा चूक म्हणून वर्गीकृत केले जाते. बरोबर कृतीला अपवोट केल जाते तर चुकीच्या कृतीला डाउनवोट केलं जाते. अशा प्रकारे, AI डेटाच्या मोठ्या उपसंचाचे विश्लेषण करते आणि चाचणी आणि त्रुटीद्वारे मानवांप्रमाणे शिकतं.

ChatGPT कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी, आम्ही विचारलेले काही मनोरंजक प्रश्न पाहू या. ChatGPT कोडर्सच्या मोठ्या प्रमाणात मदतीला येऊ शकत , ChatGPT चा वापर कोड डीबग करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि ChatGPT केवळ चूकच दुरुस्त करत नाही, तर ते वापरकर्त्याला त्यांची कुठे चूक झाली हे देखील सांगत आणि ते चूक दुरुस्त सुद्धा करून देत. ChatGPT आणखी एक मनोरंजक वापर म्हणजे ते तुमचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी कामाला येऊ शकतं आम्ही ChatGPT ला काही प्रश्न विचारले, उदा. न्यूज १८ लोकमत वर कविता लिहिण्यास सांगितले तर त्याने अवघ्या काही सेकंदात कविता लिहून दिली दुसरं म्हणजे मुंबईवर कविता सुद्धा त्याने झटक्यात लिहून दिली आणि कविता अगदी माणसाने लिहिली आहे असं वाटत होती. चॅटबॉटला सुप्रसिद्ध क्रिकेटपटू धोनी या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले तर चॅटबॉटने अवघ्या काही सेकंदात निबंध लिहुन दिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, निबंध खूप चांगला होता आणि त्यात कोणत्याही चुका नव्हत्या. याव्यतिरिक्त, असं वाटत होत की तो निबंध एखाद्या माणसाने लिहिला आहे. https://chat.openai.com ह्या वेबसाईटला भेट देऊन तुम्हीपण तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या