JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Vodafone आणि Airtelनं लाँच केला 19 रुपयांचा प्लान, कोणता आहे सर्वात बेस्ट

Vodafone आणि Airtelनं लाँच केला 19 रुपयांचा प्लान, कोणता आहे सर्वात बेस्ट

Jioला टक्कर देण्यासाठी Airtel आणि Vodafone कंपनीने लाँच केली नवीन ऑफर.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी: वोडाफोन आणि एअरटेल कंपनी एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे कायमच एकसारखे प्लान लाँच करून ग्राहकांना आपल्या कंपनीकडे आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याशिवाय Jio कंपनीला टक्कर देण्यासाठी कायमच सज्ज असतात. त्यामुळे वोडाफोन आणि एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 19 रुपयांचा धमाकेदार प्लान आणला आहे. 50 रुपयांपेक्षा स्वस्त असलेला ह्या प्लानला ग्राहक किती पसंती देतात ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 19 रुपयांच्य़ा या प्लानमधून ग्राहकांना काय सेवा मिळणार आहेत पाहा. 19 रुपयांचा airtel-vodafone plans बजेट प्लान असणार आहे. यामध्ये आपल्याला 200 MB मोबाईल डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे याची वैधता फक्त दोन दिवसांकरता असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी. हा प्लान आहे एअरटेलचा यामध्ये SMS सुविधेचा लाभ मिळणार नाही. हेही वाचा- Alert: तुमच्या बँकिंग ट्रांझेक्शन्सवर लक्ष ठेवा, युजरनेम-पासवर्डची होत आहे चोरी! vodafone plan- हा बोनस प्लान म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना 150 GB डेटा 100 SMS मिळणार आहेत. यासोबत दोन दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे. याची वैधता 2 दिवस असणार आहे. वोडाफोन आणि एअरटेल कंपनीने 19 रुपयांचे हे प्लान ग्राहकांसाठी आणले आहेत. तसं पाहायला गेलं तर वोडाफोन कंपनी SMS, कॉलिंग आणि इंटरनेट अशा तीन सेवा 19 रुपयांमध्ये देत आहे. एअरटेल कंपनी SMS सेवा देत नाही त्यामुळे 19 रुपयांमध्ये जर तुम्हाला तीनही सेवा हव्या असतील तर वोडाफोनचा प्लान बेस्ट आहे. आपण SMSच्या तुलनेत इंटरनेट जास्त वापरत असाल तर एअरटेलचा प्लान चांगला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्या एकमेकांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. हेही वाचा- 1.5 GB विसरा आता दररोज 5 GB फ्री इंटरनेट डेटा, असा आहे प्लॅन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या