JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जबरदस्त प्रोसेसर, 50 MP कॅमेरासह लाँच होणार Vivo चे तीन स्मार्टफोन, पाहा फीचर्स

जबरदस्त प्रोसेसर, 50 MP कॅमेरासह लाँच होणार Vivo चे तीन स्मार्टफोन, पाहा फीचर्स

विवो (Vivo) येत्या 9 सप्टेंबरला X70 ही नवी स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. त्यामध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : चीनची टेक कंपनी विवो (Vivo) येत्या 9 सप्टेंबरला X70 ही नवी स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. त्यामध्ये Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro+ या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. या स्मार्टफोन्सच्या ऑफिशियल लाँचिंगपूर्वीच या सीरिजच्या काही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. त्या माहितीनुसार, या फोन्समध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, 120 हर्ट्झ डिस्प्ले अशा फीचर्सचा समावेश असू शकतो. Vivo X70 - या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन 1200 प्रोसेसर असू शकतो. या फोनमध्ये Exynos 1080 हा प्रोसेसरही असू शकतो. फोनचा डिस्प्ले 6.56 इंची, रिझॉल्युशन 1080 p, तर रिफ्रेश रेट 120 Hz असू शकतो. या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. त्यात 40 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलची एक लेन्स आणि 13 मेगापिक्सेलची एक लेन्स अशा तीन कॅमेऱ्यांचा समावेश असू शकतो. 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4400mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असू शकते. Vivo X70 Pro - या स्मार्टफोनच्या लीक झालेल्या माहितीनुसार, त्याचं डिस्प्ले रिझॉल्युशन, रिफ्रेश रेट आणि स्क्रीनचा आकार Vivo X70 या मॉडेलप्रमाणेच असेल, असा अंदाज आहे. कंपनी या फोनमध्ये Exynos 1080 हा प्रोसेसर देऊ शकते. या फोनमध्येही 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4400mAh क्षमतेची बॅटरी असू शकते. तसंच क्वाड रिअर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. त्यात 40 मेगापिक्सेल क्षमतेच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह, 12 मेगापिक्सेलचा एक सेन्सर, 13 मेगापिक्सेलचा एक सेन्सर आणि एक पेरिस्कोप सेन्सर असू शकतो. या फोनच्या कॅमेऱ्याला 5x ऑप्टिकल झूमची सुविधा देण्यात आलेली असू शकते.

नेटवर्क नसतानाही करता येणार कॉल, मेसेज; iPhone 13 मध्ये येणार जबरदस्त टेक्नोलॉजी

Vivo X70 Pro+ - विवो X70 या सीरिजमधल्या फोन्सपैकी या फोनला सर्वांत उत्तम फीचर्स असतील. या फोनचा डिस्प्ले 6.78 इंची असू शकतो. त्याचं रिझॉल्युशन 2 K आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ असू शकतो. कंपनी या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्लस प्रोसेसर देऊ शकते. तसंच 4500mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता असून, ती 50W फास्ट वायरलेस चार्जिंग आणि 55W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनलाही क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. 50 मेगापिक्सेलचा सॅमसंग GN1 सेन्सर, 12 मेगापिक्सेलचा एक कॅमेरा, 48 मेगापिक्सेलचा IMX598 सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप कॅमेरा यांचा त्यात समावेश असेल. पेरिस्कोप कॅमेऱ्याला 5x ऑप्टिकल झूमची सुविधा असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या