नवी दिल्ली. 19 जुलै: गुगल क्रोम ब्राउझरचा (Google Chrome Browser) वापर जवळपास सर्वच युजर करतात. एखादी वेबसाइट पाहण्यासाठी किंवा सर्चिंग करण्यासाठी गुगल क्रोमचा वापर होतो. सर्चिंगसाठी अत्यंत सुलभ आणि सोपी सुविधा म्हणून गुगल क्रोमकडं पाहिलं जातं. गुगल क्रोमचा वापर आयफोन (iPhone) आणि अॅण्ड्राईड (Android) अशा दोन्ही युजर कडून केला जातो. अॅण्ड्राईडमध्ये तर बहुतांशवेळा गुगल क्रोम इनबिल्ट दिलं जातं. व्हिवाल्डी (Vivaldi), ओपेरा, मायक्रोसॉफ्ट एज, ब्रेव्ह ब्राउझर आदी अनेक ब्राउझर देखील सेवेसाठी गुगल क्रोमवर अवलंबून आहेत. असे हे अत्यंत उपयुक्त टुल सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आलं आहे. गुगल क्रोममध्ये एक त्रुटी असल्याचं लक्षात आलं असून, या त्रुटीमुळे हॅकर्स (Hackers) संबंधित युजर्सचा डेटा सहजपणे मिळवू शकतात. ही त्रुटी दूर करण्यात आल्याची घोषणा गुगलने केली असली तरी युजर्सने सावधगिरी बाळगावी, अशी सूचना देखील करण्यात आली आहे. जाणून घेऊया या सर्व प्रकाराविषयी… आज तकने गुगल क्रोम मधील त्रुटीबाबतच वृत्त दिलं आहे. गुगल क्रोम डिजीटल विश्वातील अत्यंत महत्वाचं टूल. परंतु, या टूलमध्ये त्रुटी असल्याचं गुगलच्या (Google) लक्षात आलं. कंपनीला यात एक बग (Bug) मिळाला असून, तो या पूर्वीपासूनच वापरला जात असावा. याचा अर्थ तो झिरो डे व्हल्नेरेबिलीटी म्हणजेच सुरक्षेतील एक त्रुटी आहे. याचा वापर कोणताही हॅकर सर्व्हिस देणाऱ्या कंपनीला माहिती न देता करु शकतो. हे वाचा - तुमचं WhatsApp Chat इतर कोणी पाहत तर नाही ना? या ट्रिकने असं तपासा या सुरक्षाविषयक त्रुटीवर काम देखील करण्यात आलं असून, ही त्रुटी दूर करण्यात आली आहे. यामुळे युजर्सच्या डिव्हाईसमध्ये रिमोट कोड एक्झिक्युट करता येऊ शकतो. याबाबत अजून काही कार्यवाही करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा की जे युजर गुगल क्रोम वापरत आहेत. त्यांनी ते तातडीनं अपडेट (Update) करणं गरजेचं आहे. परंतु, जर तुमचे गुगल क्रोम व्हर्जन 91.0.4472.164 हे किंवा त्यावरील असेल तर या त्रुटीची चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही, असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. समजा युजरने गुगल क्रोम अपडेट केलं नाही तर ही हॅकर्ससाठी सुसंधी ठरणार आहे. यामुळे हॅकर्स डिव्हाईसवर कंट्रोल मिळवू शकतील. तसेच नुकत्याच फिक्स करण्यात आलेल्या सिक्युरिटी इश्युमुळे (Security Issue) युजरचा सर्व डेटा हॅकर्सकडे जाण्याचा धोका आहे. असा डेटा जर हॅकर्सच्या हाती लागला तर तो डेटा लाखो डॉलरला डार्क वेबवर विक्री केला जातो. त्यामुळे ही त्रुटी गुगलने लक्षात येताच दूर केली आहे. ज्यांनी यापूर्वी गुगल क्रोम अपडेट केलं आहे. ते यातून सहीसलामत वाचू शकतात. परंतु, अद्याप ज्या युजर्सनं गुगल क्रोम अपडेट केलेलं नाही. त्यांनी गुगल क्रोमचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करणं आवश्यक आहे.