नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. प्रत्येक वयोगटासाठी हे आवश्यक ठरतं. नवजात बाळांचंही आधार कार्ड बनवलं जातं. बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि आई-वडिलांच्या आधार कार्डद्वारे नवजात बाळांचं आधार कार्ड बनवलं जातं. परंतु अगदी लहान असताना बनवलेल्या आधार कार्डमध्ये नंतर अपडेट करणं महत्त्वाचं ठरतं. मुलांच्या 5 वर्षानंतर आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक असतं. हे अपडेट न केल्यास मुलांचं आधार कार्ड इनअॅक्टिव्ह होऊ शकतं. UIDAI ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुलांच्या आधार कार्डचा 5 वर्षापर्यंत वापर केला जाऊ शकतो. 5 वर्षानंतर बायोमेट्रिक अपडेट न केल्यास मुलांचं आधार कार्ड इनअॅक्टिव्ह होतं. त्यानंतर मुलं 15 वर्षांची झाल्यानंतर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक असतं. मुलांचं बायोमेट्रिक अपडेट करणं पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागत नाही. बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार सेंटरवर जावं लागेल.
- त्यासाठी अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी appointments.uidai.gov.in/easearch.aspx वर क्लिक करा. - इथे Book an appointment वर क्लिक करा. - त्यानंतर डिटेल्स भरुन Proceed to appointment वर क्लिक करा. - डिटेल्स वेरिफाय करा आणि अपॉईंटमेंट बुकसाठी सबमिटवर क्लिक करा.
त्यानंतर सर्व डिटेल्ससह, कागदपत्रांसह आधार एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल. दरम्यान, 5 वर्षाखालील मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही निकष पूर्ण करण्याची गरज नाही. यात बायोमेट्रिक डेटाचीही गरज नाही. आधारची प्रोसेस आणि ऑथेंटिकेशन पालकांच्या डेमोग्राफी आणि फोटोवरुनच मुलांचं आधार वेरिफिकेशन होतं.