नवी दिल्ली, 13 जून : देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर काहीसा कमी होताना दिसतो आहे. याचदरम्यान देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान चालवलं जात आहे. ही लसीकरण (Covid 19 Vaccine) मोहिम दुर्गम भागात सहज उपलब्ध करुन देण्याच्या योजनेवरही आता सरकार काम करत आहे. त्याअंतर्गत सरकारकडून आता देशातील दुर्गम भागात, जिथे पोहचणं कठीण आहे, अशाठिकाणी ड्रोनच्या (Drones) मदतीने कोरोना लस देण्याची योजना आखली जात आहे. आयआयटी कानपूरकडून करण्यात आलेल्या एका संशोधनात हे सांगण्यात आलं आहे.
सध्या देशात कोरोना वॅक्सिन खरेदी करण्याचं काम सरकारी कंपनी एचएचएल लाइफकेअर करत आहे. याची सहाय्यक कंपनी एचएचएल इंफ्रा टेक सर्विसेज लिमिटेडने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (ICMR) देशातील दुर्गम भागात कोरोना वॅक्सिन पोहोचवण्यासाठी 11 जून रोजी निविदा मागवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत केवळ तेलंगणा ड्रोनद्वारे कोरोना वॅक्सिन पोहोचवण्याच्या निर्णयावर काम करत आहे.
दुर्गम भागात कोरोना वॅक्सिन पोहोचवण्यासाठी पाहण्यात येणाऱ्या या ड्रोनबाबत ICMR नेदेखील अभ्यास केला आहे. याअंतर्गत या कामासाठी अशा ड्रोनचा वापर केला जाईल, जे 35 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतील. तसंच 100 मीटर उंचीपर्यंत उडू शकतील. यासाठी 22 जूनपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत.
आयआयटी कानपूरच्या सहकार्याने ICMR ने यासंदर्भात संशोधन केल्याचं सांगण्यात आलं आहे. यात त्यांनी कोरोना लस ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या दुर्गम भागात पोहोचवता येऊ शकते का ते पाहण्यात आलं. ICMR ची ही चाचणी यशस्वी ठरली.
ICMR ने ड्रोनद्वारे कोरोना लशीच्या यशस्वी सप्लायसाठी एक स्टँडर्ड प्रोटोकॉल तयार केला आहे. त्याशिवाय आयसीएमआर दुर्गम भागात वॅक्सिन पोहोचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचं मॉडेल तयार करण्यावरही काम करत आहे. हे ड्रोन चार किलोपर्यंतचं वजन घेऊन उडण्यास सक्षम असतील. लस, सेंटरपर्यंत पोहोचवून तेथून पुन्हा परतण्यासाठीही ड्रोन सक्षम असतील. ड्रोनचं टेक ऑफ आणि लँडिंग DGCA च्या गाइडलाइन्सवर आधारित असेल. यात पॅराशूट आधारित डिलीव्हरी सिस्टम असणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Corona vaccine, Coronavirus, Drone shooting