JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / iPhone फुल Charge करण्यासाठी इतकं येतं विजेचं बिल, ऐकून व्हाल हैराण

iPhone फुल Charge करण्यासाठी इतकं येतं विजेचं बिल, ऐकून व्हाल हैराण

अनेकदा लोकांमध्ये फोन चार्ज करण्यासाठी किती वीजेचा वापर होत असेल, असा प्रश्न निर्माण होतो. आता याबाबतची माहिती समोर आली आहे. ज

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : Apple च्या iPhone ची मोठी क्रेझ आहे. नुकतीच iPhone 13 series लाँच झाली. अनेक यूटूयूबर iPhone वर अनेक एक्सपेरिमेंट करतात आणि iPhone ची मजबूती तपासतात. आता iPhone बाबत असा एक खुलासा झाला, जो ऐकून तुम्ही हैराण व्हाल. एका रिसर्चमधून, iPhone फुल चार्ज होण्यासाठी किती खर्च येतो याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. प्रत्येक जण कमीत-कमी वीजेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा लोकांमध्ये फोन चार्ज करण्यासाठी किती वीजेचा वापर होत असेल, असा प्रश्न निर्माण होतो. आता याबाबतची माहिती समोर आली आहे. जर तुमचा iPhone असेल, तर तो चार्ज करण्यासाठी तुमची अधिक वीज वापरली जात नाही.

तुम्हीही Phone Charge करताना ही चूक तर करत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत

Uswitch च्या रिपोर्टनुसार, दिवसातून एकदा iPhone चार्ज केल्यानंतर वर्षाला 513 रुपयांहून कमी खर्च येतो. iPhone 12 Pro Max चार्जसाठी प्रति वर्ष 322 रुपये खर्च येतो. दिवसाला एक रुपयाहून कमी, तर महिन्याला केवळ 26 रुपये इतका खर्च येतो. फोन 20W च्या चार्जरचा उपयोग करतो आणि फुल बॅटरी चार्ज करण्यासाठी दोन तास 27 मिनिटं लागतात.

तुमचा फोन Water Resistant आहे की Water Proof, जाणून घ्या काय आहे दोघांमधला फरक

फोन रात्रभर चार्ज करता? जर तुम्ही तुमचा फोन रात्रभर चार्जसाठी ठेवत असला, तर ते नुकसानकारक ठरू शकतं. फोनच्या सुरक्षेसाठी तसंच इतर मोबाइल ब्लास्टसारख्या दुर्घटनांपासून बचाव होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक फोनला त्याचं खास चार्जर असतं, त्याच चार्जरने फोन चार्ज करा. फोन, चार्जर कधीही झोपताना उशीखाली ठेवू नका. फोन उशीखाली ठेवल्याने फोनची बॅटरी सुरक्षित राहत नाही. यामुळे बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या