नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकच्या (Facebook) युझर्सचा डेटा लीक (Facebook data leak) होण्याच्या घटना मागील काही वर्षांत घडत आहेत. आता तर तब्बल 1.5 अब्ज फेसबुक युझर्सचा डेटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. ‘झी न्यूज’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ‘प्रायव्हसी अफेयर्स’ (Privacy Affairs) नावाच्या एका संशोधन संस्थेने ‘हॅकर फोरम’वर (Hacker Forum) 1.5 अब्ज फेसबुक युझर्सचा डेटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा खुलासा केला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार, अलीकडेच हॅकर फोरमवर नाव, ई-मेल, स्थळ, लिंग, फोन नंबर आणि फेसबुक युजर आयडी आदी माहिती सापडली. 1.5 अब्ज फेसबुक युझर्सचा डेटा अशा पद्धतीने सार्वजनिकपणे उपलब्ध होणं ही चिंतेची बाब आहे. तुमच्या सुरक्षेसाठी Googleने टाकलं महत्त्वाचं पाऊल, आता करावं लागणार केवळ हे काम 5 ऑक्टोबर रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअॅपचे सर्व्हर 6 तासांहून अधिक काळ बंद होते. यामुळे जगभरात संताप निर्माण झाला होता. तसंच फेसबुकचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. सर्व्हर बंद असल्यामुळे सीईओ मार्क झुकेरबर्गचं सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. यासह शेअर्सच्या भावात सुमारे 5 टक्क्यांनी घट झाली होती. त्यातच आता फेसबुक युझर्सचा डेटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. अर्थात विक्रीसाठी सापडलेला डेटा पाहता, या विक्रेत्याने प्रत्यक्षात फेसबुकच्या प्रणालींचा भंग करून ही माहिती मिळवली आहे की कसं, हे कळत नाही. फेसबुकवर सार्वजनिकपणे उपलब्ध असणारा डेटा स्क्रॅप करून मिळवण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. चोरीला गेलेला डेटा हॅकर्सना पासवर्ड हॅक करण्यासाठी मदत करणारा ठरू शकतो. त्यांना वन-टाइम लॉगिन कोड, फसवे एसएमएस पाठवता येऊ शकतात. सणासुदीला Online शॉपिंग करत असाल तर राहा Alert! होऊ शकते फसवणूक हॅकर फोरममधून संबंधित पोस्ट काढून टाकल्याचं वृत्त आहे. ‘प्रायव्हसी अफेयर्स’ यांनीही स्पष्ट केलं आहे, की उपलब्ध झालेल्या डेटामधील काही डेटा तपासला असता तो डेटा वैध असल्याचं दिसून आलं. दुसरीकडे डेटा विक्रेत्याने असा दावा केला आहे, की त्यांचा ग्रुप गेल्या 4 वर्षांपासून हे काम करत असून, आतापर्यंत 18,000 पेक्षा जास्त ग्राहकांना ही सेवा दिली आहे. दरम्यान, अशा पद्धतीने फेसबुक युझर्सचा डेटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं समोर आल्याने चिंता वाढली आहे. आपला डेटा लीक तर झाला नाही ना, आपला डेटा सुरक्षित आहे ना, अशी चिंता युझर्सना सतावत आहे.