नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : ऑनलाइन, डिजीटल (Online Fraud) जगात सायबर क्राइमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फ्रॉड करणारे विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. असाच एक प्रकार सीम कार्ड स्वॅपिंगचा (SIM Card Swaping) आहे. सीम कार्ड स्वॅपिंग म्हणजे मोबाइल सीम कार्ड बदलणं. हा फसवणुकीचा प्रकार युजर्सला कोणत्याही माहितीशिवाय केला जातो. या फ्रॉडमध्ये फ्रॉडस्टर्स मोबाइल सर्विस प्रोव्हाइडरच्या मदतीने सेम नंबरवर नवं सीम कार्ड (SIM Card) घेतात. त्यानंतर मोबाइल नंबरवर आलेल्या OTP द्वारे तुमच्या बँक अकाउंटसंबंधी आणि इतर माहिती मिळवतात.
असा होतो फ्रॉड? फ्रॉडस्टर्स फिशिंग, विशिंग, स्मिशिंग अशा सोशल इंजीनियरिंग तंत्रज्ञानाने व्यक्तीच्या बँक खात्याचे डिटेल्स आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर मिळवतात. त्यानंतर खरं सीम कार्ड ब्लॉक करण्यासाठी खोट्या आयडी प्रूफसह मोबाइल ऑपरेटरच्या रिटेल आउटलेटवर जातात आणि खरं सीम कार्ड ब्लॉक करतात. त्यानंतर वेरिफिकेशन झाल्यानंतर ग्राहकाचं सीम कार्ड डिअॅक्टिवेट केलं जातं आणि नकली ग्राहकाचं नवं सीम कार्ड जारी केलं जातं. आता सायबर क्रिमिनल्स फिशिंग फ्रॉडद्वारे (Phishing Fraud) पीडित व्यक्तीच्या फसवणूक आणि व्यवहार करण्यासाठी नव्या सीम कार्डचा वापर करतात.
राहा सावध? - तुमच्या परवानगीशिवाय तुमचा नंबर इनअॅक्टिव्ह झाल्यास, विशेषत: असा नंबर जो बँक खात्याशी लिंक असेल, तर लगेच मोबाइल ऑपरेटर आणि बँकतेही याबाबत चौकशी करा. - ऑनलाइन बँक अकाउंट पासवर्ड्स लगेच बदला. - दररोज SMS अलर्टसह ईमेल अलर्टही ऑन ठेवा. यामुळे तुमची माहिती इतरांकडे गेल्यास त्याबाबत अलर्ट केलं जाईल. - बँक अकाउंट स्टेटमेंट वेळोवेळी चेक करा. - फ्रॉड झाल्यास लगेच फोन बँकिंगशी संपर्क करा.