JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Whatsapp चॅट्स ठेवा सुरक्षित; असं लॉक करा तुमचं अकाउंट

Whatsapp चॅट्स ठेवा सुरक्षित; असं लॉक करा तुमचं अकाउंट

आता व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणखी सुरक्षित ठेवता येणार आहेत. सध्या खासगी किंवा ऑफिसच्या कामासाठीही व्हॉट्सअ‍ॅपवरून संवाद साधतो, त्यामुळे ते सुरक्षितही असलंच पाहिजे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : Whatsapp चा वापर करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणखी सुरक्षित ठेवता येणार आहेत. सध्या खासगी किंवा ऑफिसच्या कामासाठीही व्हॉट्सअ‍ॅपवरून संवाद साधतो, त्यामुळे ते सुरक्षितही असलंच पाहिजे. कधीकधी तर अगदीच महत्त्वाच्या गोष्टी प्रत्यक्ष बोलणं शक्य नसल्यानं आपण टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवतो. काही महत्त्वाचे पासवर्डही पाठवतो. ते चुकून दुसऱ्यांनी बघितले तर? त्यामुळेच Whatsapp चं फीचर वापरून तुम्ही तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. फिंगर प्रिंटनी चॅट करा सुरक्षित (Finger Print Lock) तुम्ही हाताच्या बोटाचा ठसा वापरून किंवा फेस आयडीचा वापर करून आपली चॅट्स सुरक्षित करता येतील. व्हॉट्सअपच्या Settings मध्ये जाऊन Privacy ऑप्शनमध्ये जाऊन सर्वांत शेवटचा Fingerprint Lock हा ऑप्शन एनेबल करू शकता. या लॉकमुळे तुमचे खासगी चॅट लोकांना दिसणार नाहीत. त्यामुळे तुमचे चॅट सुरक्षित होतील आणि त्याचा गैरवापरही टळेल.

(वाचा -  चुकून एखादं अ‍ॅप विकत घेतलं? Google Play Store वर असं मिळवू शकता रिफंड )

टू स्टेप व्हेरिफिकेशन (Two-factor authentication) चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी two-factor authentication अक्टिव्ह करू शकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा. सेटिंगमध्ये जा. तिथे दिसणारा Two Step verification हा पर्याय सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यावर तुमच्या मोबाईल फोनवर 6 अंकी पिन येईल. पिन टाकल्यावर हे फीचर अ‍ॅक्टिव्ह होईल. त्याच्यासोबत तुम्ही तुमचा ई-मेलही टाकू शकता.

(वाचा -  महत्त्वाची बातमी! FASTag बाबत सरकारचा मोठा निर्णय )

सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताच सुरक्षिततेचा पर्याय नव्हता. त्यामुळे कुणीही तुमचे चॅट्स वाचू शकत होतं. त्यामुळेच कंपनीने चॅट लॉकचा पर्याय दिला आहे. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी पर्यायातून हा पर्याय निवडू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या