JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फक्त एका Missed Call मध्ये करा तुमचं WhatsApp रजिस्ट्रेशन, जाणून घ्या Step by Step प्रोसेस

फक्त एका Missed Call मध्ये करा तुमचं WhatsApp रजिस्ट्रेशन, जाणून घ्या Step by Step प्रोसेस

आता व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन ( messaging application ) चा वापर अधिक सुरक्षित ( more securely ) करता येणार आहे.

जाहिरात

त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 डिसेंबर: व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) सतत येणाऱ्या नवनवीन फीचर्समुळेच (New features) कदाचित व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत म्हणजेच जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. युजर्सना (users) सतत नवीन देण्याचा कंपनीचा देखील प्रयत्न असतो. आता व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन ( messaging application ) चा वापर अधिक सुरक्षित ( more securely ) करता येणार आहे. झी बिझनेसने याबाबत वृत्त दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची हे अ‍ॅप्लिकेशन वापरण्याची आवड आणखी वाढावी, नवनवीन युजर्स याकडे आकर्षित व्हावेत, यासाठी कंपनी कोणतीही कसर सोडत नाही. हे मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन अधिक सुरक्षित करण्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन युजर्सला मिळाला आहे. आता तुम्ही तुमच्या परमनंट मोबाइल नंबरसह अ‍ॅप्लिकेशनवर रजिस्ट्रेशन करून तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित करू शकता. चला तर मग, तुमचे अकाउंट सुरक्षित कसं करायचे ते पाहूयात. हेही वाचा-  Google Pay युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 1 जानेवारीपासून बदलणार Online Payment चा हा नियम

 जेव्हा एखादा युजर्स त्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार करतो, तेव्हा तो त्याच्या करंट अकाउंट वरूनच पुन्हा रजिस्ट्रर करतो. आता यासाठी तुम्हाला तुम्ही वापरत असलेला फोन नंबर हा तुमच्याच नावावर आहे, याची खात्री करावी लागेल. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅक्टिव्ह सिम कार्ड असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार करता, तेव्हा तुम्हाला दोन वेगवेगळ्या स्क्रीन दिसतील. एका स्क्रीनमध्ये रजिस्ट्रेशन तर दुसऱ्या स्क्रीनवर व्हॉट्सअ‍ॅप टू स्टेप व्हेरिफिकेशन ( WhatsApp two Step Verification) चा पर्याय दिसेल. तुम्ही नवीन अकाउंट तयार करता किंवा तुमचे सध्याचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट पुन्हा रजिस्ट्रर करता, तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन स्क्रीन दाखवली जाईल.

अँड्रॉइड फोनवर द्यावी लागेल परवानगी व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जर मिस्ड कॉलद्वारे रजिस्ट्रर करण्याचा ऑप्शन दिला असेल, तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपला काही बाबींची परवानगी द्यावी लागेल. ही परवानगी दिल्यानंतर तुम्हाला मॅनेज कॉल्सचा ऑप्शन दिसेल. ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपला इनकमिंग फोन कॉल्स आपोआप बंद करण्याची परवानगी द्यावी लागेल. तसेच तुम्हाला कॉल लॉगचा एक्सेस सुद्धा द्यावा लागेल. जेणेकरून तुम्हाला कॉल आल्यावर तो कॉल उचलला जात आहे, हे व्हेरिफाय करणे शक्य होईल. ओटीपीद्वारे कन्फर्मेशन तुमचा रजिस्ट्रर फोन नंबर बरोबर आहे की नाही, हे तपासण्यासाठी ओटीपीद्वारे कन्फर्मेशन केले जाते. जर नंबर बरोबर असेल तर फोन कॉलद्वारे प्राप्त झालेल्या एसएमएस किंवा ओटीपी द्वारा युजर्सला आलेला 6 अंकी रजिस्ट्रेशन कोड टाकावा लागेल. ही एकमेव पडताळणी पद्धत आहे, जी तुम्हाला तुमचे अकाउंट अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी उपयोगी आहे. हेही वाचा-  Google चा Pizza Menu एंजॉय केला का? सुरू आहे ‘पिझ्झा डे’चं खास सेलिब्रेशन

 यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन स्क्रीन दिसेल. ही स्टेप पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये सुरक्षेसंबंधी अधिक ऑप्शन मिळतील. यासाठी, तुम्हाला एक फोन कॉल किंवा एसएमएस येईल, ज्याद्वारे युजर्सची ओळख व्हेरिफाय केली जाऊ शकते.

सध्या व्हॉट्सअ‍ॅप बऱ्याच नवीन फीचर्सवर काम करत आहे. युजर्सना सतत नवीन देण्याचा कंपनीचा देखील प्रयत्न असतो. यामुळे इतर सोशल साईटपेक्षा युजर्सचा कल व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याकडे अधिक असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या