JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ऑर्डर केलं एक डिलीव्हर झालं भलतंच! आता फक्त एक काम करा आणि Online Shopping मधील हा घोळ टाळा

ऑर्डर केलं एक डिलीव्हर झालं भलतंच! आता फक्त एक काम करा आणि Online Shopping मधील हा घोळ टाळा

जर तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर अशाप्रकारच्या फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी Flipkart आणि Amazon वर एक चांगला ऑप्शन आहे. शॉपिंगवेळी Open-Box Delivery हा पर्याय सिलेक्ट करुन, ऑनलाइन शॉपिंग एक्सपिरिअन्स सुरक्षित करता येईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : ऑनलाइन शॉपिंगमध्ये (Online Shopping) मोठी वाढ झाली आहे. Flipkart, Amazon सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी सेल आयोजित करुन वस्तू मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध करुन दिल्या जातात. पण मागील काही दिवसांपासून अशी अनेक प्रकरणं समोर आली, ज्यात एका युजरला स्मार्टफोन सारख्या महागड्या ऑर्डरवर साबण डिलीव्हर झाला. जर तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल, तर अशाप्रकारच्या फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी Flipkart आणि Amazon वर एक चांगला ऑप्शन आहे. शॉपिंगवेळी Open-Box Delivery हा पर्याय सिलेक्ट करुन, ऑनलाइन शॉपिंग एक्सपिरिअन्स सुरक्षित करता येईल. Flipkart किंवा Amazon वरुन कोणतीही वस्तू ऑर्डर करताना, फ्रॉडपासून वाचण्यासाठी Open-Box Delivery ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे ज्यावेळी ऑर्डर डिलीव्हर होईल, त्यावेळी तुम्ही डिलीव्हरी बॉयसमोरच ती वस्तू ओपन करुन तुम्ही ऑर्डर केलेलं योग्य स्थितीत आहे की नाही ते तपासू शकता. फ्लिपकार्टवर सामान चेक केल्यानंतर, डिलीव्हरी बॉयला ग्राहक एक OTP पाठवतो. त्यानंतर योग्य डिलीव्हरी पोहोचल्याचं समजलं जातं. हा OTP केवळ ग्राहकचं देऊ शकतो. मागील काही दिवसांत Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल आणि Flipkart च्या बिग बिलियन डेज सेलमध्ये अशी अनेक प्रकरणं समोर आली, जिथे ग्राहकांना ऑर्डर केलेल्या प्रोडक्टच्या जागी काही वेगळीचं वस्तू आली. पण याचा दोष केवळ कंपनीवरच टाकणं योग्य नाही. कारण अनेकदा कंपनी योग्य वस्तू पाठवते, आणि डिलीव्हरी बॉय चालाखीने प्रोडक्ट बदलतात. या गोष्टीचा दोष ते सहजपणे कंपनीवर टाकतात. त्यामुळे Open-Box Delivery पर्याय सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरतो.

Flipkart ने iPhone 12 ऐवजी पाठवला साबण, VIDEO पाहून व्हाल हैराण

त्यामुळे कोणत्याही अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी ओपन बॉक्स डिलीव्हरी ऑप्शन निवडणं सर्वात चांगली सुविधा आहे. प्रोडक्ट योग्य नसल्यास, Amazon, Flipkart रिफन्डही करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या