JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / OLA पुण्यात सुरू करणार नवं टेक्नोलॉजी सेंटर; हजारो लोकांना नोकरीची संधी

OLA पुण्यात सुरू करणार नवं टेक्नोलॉजी सेंटर; हजारो लोकांना नोकरीची संधी

Olaचं देशातील हे दुसरं केंद्र असेल. या केंद्रात तीन वर्षात तंत्रज्ञानात कुशल असणाऱ्या 1000 व्यक्तींना नोकरी मिळू शकते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर : ऑनलाईन कॅब बुकिंग सर्व्हिस देणारी कंपनी ओलाने (Ola) पुण्यात एक नवं टेक्नोलॉजी सेंटर (Technology Centre) स्थापन करण्याची योजना आखली आहे. या योजनेंतर्गत पुढील काही वर्षात जवळपास 1000 इंजिनियर्सला नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे. OLA देशातील दुसरं टेक्नोलॉजी सेंटर - सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवं सेंटर ओलाला भारत आणि इतर देशांतील व्यवसायासाठी आवश्यक असेलल्या तंत्रज्ञानाच्या निराकरणास मदत करेल. मोबाईल ऍप आधारित टॅक्सी सेवा कंपनी Olaचं देशातील हे दुसरं केंद्र असेल. यापूर्वी एक सेंटर बंगळुरूमध्ये आहे. ओलाच्या प्रवक्त्यांनी याबाबत तपशील देण्यास नकार दिला आहे. परंतु या योजनेसंबंधी माहिती असलेल्या एका व्यक्तीने, पुण्यातील केंद्र या तिमाहीच्या अखेरीस सुरू होण्याबद्दल सांगितलं आहे. या केंद्रात तीन वर्षात तंत्रज्ञानात कुशल असणाऱ्या 1000 व्यक्तींना नोकरी मिळू शकते. ओलाचे 4000 कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास 1500 इंजिनियर्स आहेत. ओलाने गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक ऍडव्हान्स सेंटर सुरू केलं होतं.

(हे वाचा -  ..अन्यथा अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा )

Uber - ola व्यतिरिक्त Uber ही देशात 140 इंजिनियर्सची भरती करणार असल्याची माहिती आहे. बंगळुरू आणि हैदराबादमध्ये ही भरती असू शकते. यादरम्यान कर्मचारी चालक, ड्रायव्हर्सच्या संख्येत वाढ, बाजार, ग्राहक सेवा, डिजिटल पेमेंट्स, पुरवठा, सुरक्षा आणि आर्थिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्याधुनिक उत्पादन तयार करेल. कंपनीच्या हैदराबाद आणि बंगळुरू स्थित कार्यालयात 600 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

(हे वाचा -  आता चोरी होणार नाही तुमची कार; ‘हे’ हायटेक लॉक होणार गार्ड )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या