JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जुने iPhone धोकादायक, तुम्हीही वापरत असाल तर काळजी घ्या

जुने iPhone धोकादायक, तुम्हीही वापरत असाल तर काळजी घ्या

जुने आयफोन डेटाबाबत सुरक्षित नाहीत. कारण अॅपलने जुन्या आयफोनचे अपडेट देणं बंद केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवीन मोबाइल बाजारात आले की जुन्या फोनच्या किंमती कमी होतात. यामुळे जुने फोन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. महागड्या फोनच्या किंमतीबाबतही हेच होतं. त्यामुळे असे फोन विकत घेण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र हे फोन धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. यात जुने आयफोन डेटाबाबत सुरक्षित नाहीत. कारण अॅपलने जुन्या आयफोनचे अपडेट देणं बंद केलं आहे. त्यामुळे हे आयफोन प्रायव्हसी आणि सिक्युरीटीच्या बाबतीत धोक्याचे ठरू शकतात. लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम नसलेल्या फोन्सना हॅकर्स सहज निशाणा बनवू शकतात. यामध्ये युजर्सचा डेटा चोरी केला जाण्याची शक्यता अधिक असते. तसेच या आयफोनमध्ये अँटीव्हायरस अॅपसुद्धा डाऊनलोड करता येत नाही. नव्या वर्षापासून आयफोनच्या कोणत्या मॉडेलचे नवीन अपडेट मिळणार नाही याची माहिती अॅपलने दिली आहे. यामध्ये आयफोन 6 आणि त्याच्या आधीच्या फोनचा समावेश आहे. म्हणजेच 5C, 5S, 5, 4S, 4, 3GS, 3G या फोनचे अपडेट देणं कंपनीने बंद केलं आहे. सावधान! हॅकर्सने शोधून काढला नवा फंडा, तुमची फक्त एक चूक पडू शकते महागात जुने आयफोन सहज हॅक होऊ शकतात. जुन्या आयफोनवर टेक्स्ट किंवा व्हॉटस्अॅप मेसेज पाठवूनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. हॅकर्स यामध्ये अॅपल अॅप स्टोअरच्या माध्यमातून व्हायरस फोनमध्ये घुसवू शकतात. त्यामुळे जुने अपडेट बंद झालेले फोन वापरणं धोक्याचं आहे. त्यात तुमचा डेटा चोरी होण्याची शक्यता असते. तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे? आधी वाचा हे नियम चांगल्या Photographyसाठी ‘हे’ आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या