नवी दिल्ली, 22 डिसेंबर : तुम्ही ऑफिस किंवा इतर कुठे जाण्यासाठी Ola कॅब बुक केली असेल, तर कधीतरी कॅब ड्रायव्हरने तुमची राइड कॅन्सल केल्याची किंवा कुठे जायचं आहे असा प्रश्न विचारल्याचा अनुभव आला असेल. पण आता कॅब ड्रायव्हर तुमचं डेस्टिनेशन लोकेशन विचारणार नाही. Ola ने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर आता राइड सुरू करण्याआधीच आपल्या मोबाइल फोनवर प्रवाशाला कुठे जायचं आहे आणि तो पेमेंट रोख किंवा ऑनलाइन अशा कोणत्या माध्यमातून करणार आहे, याची माहिती घेता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ओलाचे को-फाउंडर भावीश अग्रवाल यांनी मंगळवारी ट्वीट करुन सांगितलं, की ड्रायव्हरकडून राइड कॅन्सल होणं ही मोठी समस्या आहे. कंपनी ही समस्या संपुष्ठात आणू इच्छिते.
प्रवाशांना असा होणार फायदा - कंपनीच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या नव्या सिस्टममध्ये जर एखाद्या कॅब ड्रायव्हरला राइड कॅन्सल करायची असेल, तर तो लगेच त्याचवेळी कॅन्सल करेल. यामुळे प्रवाशाला वाट पाहावी लागणार नाही आणि वेळ वाचेल.
Ola Cab बुक करणाऱ्यांना अनेकदा अशा समस्येचा सामना करावा लागत होता. अनेकदा बुकिंग कन्फर्म झाल्यानंतर कॅब ड्रायव्हर पिक-अप लोकेशवरवर पोहचण्याआधी प्रवाशाला फोन करुन त्यांना कुठे जायचं आहे आणि पेमेंट कॅश किंवा ऑनलाइन असणार याबाबत चौकशी करायचे. जर प्रवासी त्यांच्या नुसार नसेल, तर डेस्टिनेशनवर जाण्यासाठी नकार देऊन राइड कॅन्सल केली जात होती.
कॅब ड्रायव्हरला आधीच समजेल प्रवाशाचं डेस्टिनेशन - राइड कॅन्सल केल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो, त्याशिवाय वेळ वाया जाऊन हव्या त्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही. परंतु नव्या सिस्टमचा फायदा कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांना होणार आहे. राइड कॅब ड्रायव्हरने लगेच कॅन्सल केली जर वेळ जाणार नाही. आणि ड्रायव्हर एखाद्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी कंफर्टेबल नसेल, तर तो राइड कॅन्सल करू शकतो.