JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / OLA e-scooter भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे किंमत

OLA e-scooter भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे किंमत

OLA e-scooter बुक करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग करावं लागेल. ओला ई-स्कूटर 10 रंगात उपलब्ध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : ओला कंपनीने (Ola) आज पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीने दोन वेरिएंटमध्ये ही ई-स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची (OLA e-scooter) सुरुवातीची किंमत 99,999 रुपये आहे. लाईव्ह इव्हेंटमध्ये कंपनीच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, OLA e-scooter दोन वेरिएंट S1 आणि S1 Pro मध्ये लाँच केली आहे. S1 एक रिवॉल्यूशनरी प्रोडक्ट असून याची किंमतही रिवॉल्यूशनरी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, S1 वेरिएंटची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. तर S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये आहे. या दोन्ही किमती एक्स शोरुम आहेत. त्याशिवाय जर EMI वर स्कूटर खरेदी करायची असल्यास, कंपनीने त्यासाठीही पर्याय दिला आहे. इच्छूक ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर बँकांची EMI लिस्ट तपासू शकतात.

Ola Electric Scooter चे भन्नाट फीचर्स; कंपनीने शेअर केलेला हा VIDEO पाहाच

संबंधित बातम्या

अशी बुक करता येईल OLA e-scooter - OLA e-scooter बुक करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग करावं लागेल. ओला ई-स्कूटर 10 रंगात उपलब्ध आहे. 400 शहरांत चार्जिंग पॉईंट - भारतात ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कंपनी 400 शहरांत 100000 हून अधिक लोकेशन किंवा टचपॉईंट्सवर हायपर चार्जर लावेल. कोणकोणत्या शहरात चार्जिंग पॉईंट्स आहेत, याची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. ओलाची ही स्कूटर भारतातच मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत बनवली जाणार आहे. त्यासाठी कंपनी भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर ती 240 किलोमीटरपर्यंत चालेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या