JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / प्रवासात आहात आणि Internet नाहीये? टेन्शन नॉट; आता इंटरनेटशिवायही काम करेल WhatsApp; कसं ते वाचा

प्रवासात आहात आणि Internet नाहीये? टेन्शन नॉट; आता इंटरनेटशिवायही काम करेल WhatsApp; कसं ते वाचा

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशी सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरता येत नाहीत. त्याकरता व्हॉट्सअ‍ॅपनं आता खास फीचर आणलं आहे.

जाहिरात

आता इंटरनेटशिवायही काम करेल Whatsapp

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी:  व्हॉट्सअ‍ॅप पाहिल्याशिवाय राहवतच नाही, असे अनेक जण असतात. त्यांच्यासाठी इंटरनेट शटडाउन म्हणजे फार मोठी गोष्ट असते. बरेचदा सरकारकडून काही आपत्कालीन प्रसंगांत इंटरनेट शटडाऊन केलं जातं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशी सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरता येत नाहीत. त्याकरता व्हॉट्सअ‍ॅपनं आता खास फीचर आणलं आहे. या फीचरमुळे इंटरनेटशिवायही व्हॉट्सअ‍ॅप वापरता येऊ शकेल. ते फीचर कसं वापरायचं, त्याबाबत ‘डीएनए’नं सविस्तर वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप केवळ संवादासाठीच नाही, तर अनेक गोष्टींसाठी वापरता येतं. अगदी परदेशातूनही एखादं कागदपत्र, फोटो, संपर्क क्रमांक, व्हिडिओ क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहचू शकतं. हे सगळं केवळ इंटरनेट नेटवर्कमुळे शक्य होतं. इंटरनेट शटडाउन असेल, किंवा कनेक्टीव्हिटी स्लो असेल तर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येत नाही. हे लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपनं आता प्रॉक्सी सपोर्ट हे नवीन फीचर आणलेलं आहे. या फीचरमुळे इंटरनेटशिवायही व्हॉट्सअ‍ॅप वापरणं शक्य होईल. Work From Home सोडून रोज टाईमपास करत होती महिला; एका सॉफ्टवेअरनं केली पोलखोल प्रॉक्सी सपोर्टमध्ये जगभरातल्या विविध संघटना किंवा स्वयंसेवकांच्या सर्व्हर्सचा वापर करून युजर्स व्हॉट्सअ‍ॅपशी कनेक्ट होऊ शकतात. इंटरनेट असेल, तर तुम्ही जगभरात कोणी प्रॉक्सी सर्व्हर्स तयार केले आहे, हे सर्च इंजिन किंवा सोशल मीडियावरून शोधू शकता. अँड्रॉईड फोनवरून प्रॉक्सीशी कनेक्ट होण्यासाठी - व्हॉट्सअ‍ॅपच्या मेनूमध्ये सेटिंग्ज बटणावर क्लिक करा. - त्यात स्टोरेज अँड डेटा या पर्यायावर जाऊन प्रॉक्सी या बटणावर क्लिक करा. - यूज प्रॉक्सी हा पर्याय निवडावा. - मग सेट प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करून त्यात प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकावा व सेव्ह करावं. - बरोबरची खूण आल्यास कनेक्शन जोडलं गेलंय असं समजावं. - प्रॉक्सी टाकूनही व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा फोटो पाहता येत नसतील, तर तो अ‍ॅड्रेस ब्लॉक झालाय असं समजावं. - त्या प्रॉक्सीवर जास्त वेळ क्लिक करून ठेवून तो अ‍ॅड्रेस डिलीट करावा. मग नवीन अ‍ॅड्रेस टाकून प्रयत्न करावा. आयफोनवरून प्रॉक्सी सेट करण्यासाठी - व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जावं. - त्यात स्टोरेज अँड डेटामध्ये जाऊन प्रॉक्सी पर्याय निवडावा. - यूज प्रॉक्सी पर्याय निवडून मग सेट प्रॉक्सीवर क्लिक करावं. - तिथे प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकावा व सेव्ह करावं. Instagram वरील एक पोस्ट बघणं महिलेला पडलं महागात; जॉब लावून देण्याच्या बहाण्याने केलं धक्कादायक कृत्य प्रॉक्सी सर्व्हर वापरल्यानं आपल्या माहितीची सुरक्षा धोक्यात येईल, असं काहींना वाटू शकतं. मात्र व्हॉट्सअ‍ॅपनं त्याबाबत खात्री दिली आहे. प्रॉक्सीद्वारे कनेक्ट केल्यावरही तुमच्या डेटाची सुरक्षा सांभाळली जाते. प्रॉक्सी सर्व्हर्स, व्हॉट्सअ‍ॅप किंवा मेटा यांना कोणालाही तुमचे मेसेज दिसत नाहीत, असं व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉगवर लिहिण्यात आलंय. थर्ड पार्टी प्रॉक्सी वापरताना तुमचा आयपी अ‍ॅड्रेस प्रॉक्सी देणाऱ्याकडे जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅप असे थर्ड पाटी प्रॉक्सी देत नाही. म्हणजेच सुरक्षेबाबतची संपूर्ण हमी व्हॉट्सअ‍ॅप देतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या