JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता BookMyShow वर चित्रपटही पाहता येणार; कंपनीची नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू

आता BookMyShow वर चित्रपटही पाहता येणार; कंपनीची नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू

BookMyShow ने आपली नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू केली आहे. आता BookMyShow App वर युजर्सला ऑनलाईन मूव्हीदेखील पाहता येणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : ऑनलाईन मूव्ही तिकीट सेल करणारं प्लॅटफॉर्म बुकमायशोने (BookMyShow) आपली नवी स्ट्रीम सर्व्हिस सुरू केली आहे. आता BookMyShow App वर युजर्सला ऑनलाईन मूव्हीदेखील पाहता येणार आहे. कंपनी युजर्सला 600 हून अधिक चित्रपट आणि 72000 हून अधिक तासांचा कंटेंट देत आहे. बुकमायशो स्ट्रीम सर्व्हिसमध्ये जगभरातील चित्रपट आणि कंटेंटची एक लायब्ररी असणार आहे. यात 22 हजारहून अधिक तासांचा कंटेंट एक्सक्यूसिव असेल, जो याच प्लॅटफॉर्मवर लाँच होईल. रेंट आणि सब्सक्रिप्शन - बुकमायशो स्ट्रीममध्ये प्रत्येक शुक्रवारी अनेक प्रीमियर होतील. त्याशिवाय बुकमायशो स्ट्रीमवर युजर्स मूव्ही रेंट आणि सब्सक्रिप्शनवरही घेऊ शकतात. याचा चार्टही कॅटेगरी सिलेक्शननुसार वेगवेगळा असेल, जो 40 ते 700 रुपयांपर्यंत असेल. बुकमायशोचे सीईओ आशिष सक्सेना यांनी सांगितलं की, बुकमायशो चित्रपटांचा प्रीमियर, एक्सक्यूसिव, वर्ल्ड सिनेमा, मिस्ड इन थिएटर्स, फेस्टिव्हल फेव्हरेट आणि डेडिकेटेड बंडल्ससारख्या कॅटेगरी अंतर्गत लक्षकेंद्रीत करेल. या कॅटेगरी युजर्सच्या पसंद, मूड आणि नेचरनुसार विभागण्यात आल्या आहेत.

(वाचा -  300 कोटीहून अधिक ईमेल आणि पासवर्ड लीक; तुमचं अकाउंटही हॅक झालंय का? असं तपासा )

हॉलिवूड चित्रपट - बुकमायशो स्ट्रीममध्ये युजर्स क्रिस्टोफर नोलन फिल्म टेनट, गॅल गॅडोट स्टारर वंडर वुमन 1984 आणि हॉरर फँटेसी द क्राफ्ट: लिगेसी यासारखे चित्रपट पाहू शकतात. विशेषकरून ज्यांनी हे चित्रपट थिएटर्समध्ये मिस केले आहेत, त्यांना असे चित्रपट पाहण्याची संधी आहे. सोनी पिक्चर्स, वार्नर ब्रदर्स आणि युनिवर्सल पिक्चर्ससह ग्लोबल प्रोड्यूसर्स यांच्या भागीदारीसह हॉलिवूडचा कंटेंट सादर करणार असल्याचं सक्सेना यांनी सांगितलं. ग्लोबल कंटेंटशिवाय प्रमुख भारतीय प्रोडक्शन हाउस वायाकॉम 18, शेमारू आणि राजश्री प्रोडक्शन्ससह इतर रिजनल कंटेंट चित्रपटही असणार आहेत. बुकमायशो स्ट्रीम एक इनोव्हेशन आहे. हा प्लॅटफॉर्म थिएटर्सचा अनुभव घेऊ शकत नाही, परंतु हा सिनेमा व्यवसायातील एक विस्तार आहे. थिएटर्समध्ये मूव्ही रिलीज झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर चित्रपट सादर होतील, असंही सक्सेना म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या