JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Online Fraud चा नवा प्रकार; कॅश ऑन डिलीव्हरीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक

Online Fraud चा नवा प्रकार; कॅश ऑन डिलीव्हरीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक

फ्रॉड करणारे नव्या पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत. यात कॅश ऑन डिलीव्हरी (Cash On Delivery) हा नवा फ्रॉड समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 5 जुलै: तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आधीच्या तुलनेत आता ऑनलाईन शॉपिंग सुरक्षित झालं आहे. वस्तूची डिलीव्हरी होतानाचे फसवणुकीचे प्रकार तुलनेने कमी झाले आहेत. ऑनलाईन फोन ऑर्डर केल्यानंतर बॉक्समध्ये विट आल्याचे, असे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले होते. तुलनेने आता सुरक्षितरित्या सामान घरी पोहोचवलं जातं. परंतु आता फ्रॉड करणारे नव्या पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत. यात कॅश ऑन डिलीव्हरी (Cash On Delivery) हा नवा फ्रॉड समोर आला आहे. व्यक्तीला एखादा कॉल येतो आणि डिलीव्हरी एग्झिक्युटिव्ह बोलत असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर कॅश ऑन डिलीव्हरी ऑर्डरबाबत पैसे मागितले जातात. तुम्ही काही ऑर्डरही केलेलं नसतं, तरीदेखील डिलीव्हरी एग्झिक्युटिव्ह एक पार्सल देऊन, पैशांची मागणी करतो. तसंच कुरियर कंपनीच्या नावानेही फेक मेसेज येऊ शकतो आणि लिंकवर क्लिक करुन पैशांची मागणी केली जाते. ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढत असताना, दुसरीकडे स्कॅमर्सकडून अनेकांची फसवणुकही होत आहे. स्कॅमर्स कोणी ना कोणी या जाळ्यात अडकणार असंच समजतात. जर तुम्ही घरी नसलात, तर तुमच्या शेजारी फेक पार्सल डिलीव्हर करुन, त्यांच्याकडूनही पैसे घेतले जातात. चुकूनही करू नका या गोष्टी - जर एखाद्याने कॉल करुन अशाप्रकारे पार्सल डिलीव्हरीची माहिती दिल्यास त्याकडे लक्ष देऊ नका. तसंच एकदा अ‍ॅपमध्ये परचेस हिस्ट्री तपासा, यामुळे तुम्ही काही ऑर्डर केलं नाही ना याची खात्री होईल.

(वाचा -  तुमचं Facebook Account हॅक झाल्यास काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस )

SMS स्कॅम - युजरला डिलीव्हरीचा SMS येतो, ज्यात पॅकेज डिलीव्हर न केल्याची माहिती असते. त्यानंतर काही दिवसांनी लॉकडाउन आणि कोरोनाची प्रकरणं कमी झाल्यानंतर पुन्हा डिलीव्हरीसाठी पॅकेजची माहिती दिली जाईल आणि याबदल्यात पर्सनल माहिती मागितली जाईल. त्यानंतर पॅकेज डिलीव्हरीसाठी वेळ लावला जातो आणि लवकर डिलीव्हरी करण्यासाठी पेमेंट मागितलं जातं. पेमेंट केल्यानंतर युजर्स स्कॅमर्स जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणत्याही लिंक, SMS किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नका आणि सुरक्षित राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या