JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Windows 11 Tips : लॅपटॉप वापरत असाल तर आताच माहिती करून घ्या हे शॉर्टकट्स, काम होईल आणखी सोपं!

Windows 11 Tips : लॅपटॉप वापरत असाल तर आताच माहिती करून घ्या हे शॉर्टकट्स, काम होईल आणखी सोपं!

मायक्रोसॉफ्टने (Microsoft) गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं ‘विंडोज 11’ हे व्हर्जन लाँच केलं होतं. यामध्ये त्यांनी जुने बग दुरुस्त करून, काही नवीन फीचर्सही (Windows 11 features and shortcuts) दिली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : मायक्रोसॉफ्टने (Microsoft) गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं ‘विंडोज 11’ हे व्हर्जन लाँच केलं होतं. यामध्ये त्यांनी जुने बग दुरुस्त करून, काही नवीन फीचर्सही (Windows 11 features and shortcuts) दिली होती. हा अपडेट लाँच होऊन आता जवळपास एक वर्ष होईल; मात्र कित्येकांना त्यातली काही खास फीचर्स (Windows 11) अजूनही माहिती नाहीत. विंडोजच्या या अपडेटमध्ये काही असे शॉर्टकट्स (Windows 11 shortcuts) दिले आहेत, ज्यामुळे तुमचं काम अगदी सोपं आणि जलद होऊ शकतं. या शॉर्टकट्सची माहिती आज इथे देत आहोत. अशा प्रकारे शोधा फाइल एखादी फाइल शोधणं हे काम तसं बरंच वेळखाऊ असतं; मात्र ‘विंडोज 11’मध्ये यासाठी विशेष शॉर्टकट दिला आहे. यासाठी तुम्हाला विंडोज की+एस (Windows logo+S) ही बटणं दाबायची आहेत. हे केल्याने तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीच्या स्क्रीनवर सर्च विंडो उघडेल. यामध्ये तुम्ही तुमची फाइल किंवा डॉक्युमेंटचं नाव टाकून सर्च करू शकता. स्क्रीनशॉट तुमच्या मोबाइलमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट (Windows shortcut keys for Screenshot) घेऊ शकता हे सर्वांनाच माहिती आहे. पीसीच्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठीदेखील विंडोज 10 आणि 11 मध्ये शॉर्टकट देण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला विंडोज लोगो, शिफ्ट आणि एस (Windows logo+Shift+S) ही बटणं एकत्र दाबावी लागतील. यानंतर तुम्ही माउसच्या मदतीने जेवढ्या भागाचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तेवढा भाग सिलेक्ट करू शकता. या फोटोला कंट्रोल+व्ही (Ctrl+V) बटणांच्या साह्याने कॉपी करून व्हॉट्सअ‍ॅप किंवा कोणत्याही चॅटबॉक्समध्ये पेस्ट करू शकता. तुम्हाला तुमचा स्क्रीनशॉट मिळेल. अ‍ॅप्ससाठी विविध शॉर्टकट्स विंडोज 11 मध्ये एकाच वेळी तुम्ही भरपूर अ‍ॅप्स सुरू केली असतील आणि हे सगळं तुम्हाला एकाच वेळी स्क्रीनवर पाहायचं असलं, तर त्यासाठीदेखील शॉर्टकट आहे. यासाठी तुम्हाला विंडोज की Maximise बटणावर क्लिक करायचं आहे किंवा विंडोज+झेड (Windows logo+Z) ही बटणं दाबायची आहेत. यानंतर सर्व अ‍ॅप्स एकत्र दिसू लागतील. तुम्ही बरीच अ‍ॅप्स किंवा फाइल्स ओपन केल्या असतील आणि तुम्हाला होम पेजवर जायचं असेल तर त्यासाठी सर्व गोष्टी मिनिमाइज किंवा बंद कराव्या लागतात. तसं न करताही तुम्ही होमपेजवर जाऊ शकता. यासाठी विंडोज+डी (Windows logo+D) हा शॉर्टकट तुम्हाला मदत करील. ही बटणं दाबल्यानंतर सुरू असलेली सर्व अ‍ॅप्स आणि फाइल्स एकाच वेळी मिनिमाइज होतात आणि तुम्ही होम स्क्रीनवर पोहोचता. हा शॉर्टकट तुम्ही विंडोज 11 आणि 10 या दोन्ही ओएसमध्ये वापरू शकता. इमोजी चॅटिंग करताना इमोजी वापरायची सवय बहुतांश जणांना असते. मोबाइलवर तुम्हाला इमोजी सहज उपलब्ध असतात. पीसीवर चॅटिंग करताना इमोजी लगेच सापडत नाहीत. अशा वेळी तुम्हाला विंडोज आणि पूर्णविराम Windows logo + (.) हे चिन्ह असलेली बटणं एकत्र दाबायची आहेत. यानंतर तुमच्या स्क्रीनवर सर्व इमोजींचा बॉक्स दिसू लागेल, ज्यातून तुम्ही आवडता इमोजी निवडू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या शॉर्टकट्सच्या मदतीने तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा पीसी वापरण्याचा अनुभव आणखी जलद, सोपा आणि मनोरंजक करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या