नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सीजन तोंडावर असताना ऑटो आणि टेक इंडस्ट्रीमध्ये डिस्काउंट आणि आपले प्रोडक्ट्स अधिकाधिक विक्रीसाठी मोठी चढाओढ, स्पर्धा असते. फ्लिपकार्ट (Flipkart),अमेझॉन (Amazon),ऍपल (apple),रियलमी (realme) आणि अनेक ऑटो कंपन्यांनंतर आता शाओमीनेही दिवाळी विथ एमआय (Diwali with MI)सेलची घोषणा केली आहे. शाओमीचा हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरू होतोय. पण कंपनीकडून आपल्या गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम व्हिआयपी मेंबर्ससाठी सेल एक दिवस आधी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. हा सेल कंपनीच्या अधिकृत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म MI.Com वर सुरू होणार आहे. शाओमीने ऍक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदासह करार केला आहे. या बँकांच्या ग्राहकांना या सेलमध्ये डिस्काउंट आणि कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे. या सेदरम्यान शाओमी आपले MI 10T आणि MI 10T Pro हे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हे वाचा - Diwali Offer! Apple कडून 18,900 रुपयांचे AirPods फ्री शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विट करत, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम व्हिआयपी मेंबर्सला सेलचा एक दिवस आधी फायदा घेता येणार असल्याचं सांगितलं. त्याशिवाय ऍक्सिस बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यावर 1 हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काउंटही मिळणार आहे. शाओमीचा हा सेल 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर असा सहा दिवस असणार आहे.
Diwali with MI सेल - शाओमीने PatakaRun गेम खेळून गिफ्ट जिंकण्याची संधी, Mi पेमधून खरेदी केल्यास 5000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक जिंकण्याची संधी आणि वॉरंटी एक्सटेंड करण्यासाठी 399 रुपयांऐवजी 199 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 रुपयांत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी
या सेलदरम्यान, कंपनीने 1 रुपयावाला फ्लॅश सेलही आणला आहे. या सेलमध्ये 17 हजार रुपयांच्या रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro), 14 हजारांचा Mi टीव्ही 4A 32-इंच हॉरिजेंटल एडिशनसह इतरही प्रोडक्ट्स 1 रुपयांत खरेदीची करण्याची ऑफर आहे.