नवी दिल्ली, 15 मार्च : भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात “मेरा राशन” (Mera Ration) नावाने एक मोबिले अँप (Mobile App) लाँच केलं आहे. या अॅपद्वारे गरजू कुटुंबियांना जवळच्या जवळ स्वस्त धान्य दरासह, रेशन कार्डमध्ये आपली स्थिती आणि रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळेल. Mera Ration Mobile App अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आलं आहे. युजर्स हे अॅप Google Play Store वरुन डाउनलोड करू शकतात. वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) या मोहिमेंतर्गत Mera Ration मोबाईल अॅप लाँच करण्यात आलं आहे. एखादा रेशन कार्डधारक आपलं घर बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यास, त्याला या मोबाईल अॅपवर जवळ स्वस्त धान्य दुकान कुठे आहे याची माहिती मिळेल. सरकारी माहितीनुसार, देशभरात 69 कोटी लोकांना National Food Security Act (NFSA) चा फायदा होत आहे. National Food Security Act (NFSA) माहितीनुसार, या अॅक्टद्वारे रेशन कार्डधारकांना Public Distribution System द्वारे केवळ 1 ते 3 रुपये प्रति किलोग्रॅमच्या हिशोबाने धान्य मिळतं. ही सुविधा 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोट्यवधी लोकांना मिळते आहे.
आता Mera Ration मोबाईल अॅपद्वारे रेशन कार्ड धारकांना अधिक फायदा होऊ शकतो. सध्या या अॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषा आहेत. परंतु लवकरच हे अॅप प्रमुख 14 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे, जेणेकरुन देशभरातील लोक रेशन कार्ड आणि त्यावर मिळणाऱ्या फायद्यांबाबत संपूर्ण माहिती घेऊ शकतील.
Mera Ration Mobile App चा वापर करणं सोपं आहे. गुगल प्ले स्टोरवर हे अॅप उपलब्ध आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरने यात स्वत:ला रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर युजरकडे रेशन कार्ड नंबर मागितला जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा आणि त्यानंतर अॅपवर रेशन कार्डसंबंधी संपूर्ण माहिती मिळेल.