नवी दिल्ली, 8 डिसेंबर : विविध कार कंपन्या यावर्षात आपल्या अनेक गाड्यांवर डिस्काउंट देत आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आला होता. त्यानंतर आता भारतीय वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने (mahindra) आपल्या काही गाड्यांवर डिस्काउंट-ऑफर्स जाहीर केल्या आहेत. डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल. यात कॅश डिस्काउंट (cash discount), एक्स्चेंज बोनस (exchange bonus), कॉर्पोरेट बोनस (corporate bonus) तसंच गाडीबरोबर कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेसरीजदेखील मिळणार आहेत. साधारणपणे ॲक्सेसरीज घेण्यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागतात. परंतु या कालावधीत कंपनी त्या फ्रीमध्ये देणार आहे. जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपन्या विविध ऑफर्स देत असतात. कोरोना काळात (covid19) वाहनांच्या विक्रीमध्ये देखील घट झाली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षाच्याआधी विविध ऑफर्सच्या मदतीने हा जुना स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या काही गाड्यांवर मिळतोय भरघोस डिस्काउंट Mahindra Alturas G4 - महिंद्राच्या या गाडीवर 2 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळतो आहे. तर 50,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस, 16,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, तर 20,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळणार आहेत. Mahindra XUV500 - XUV500 W5 आणि XUV500 W7 या दोन्ही गाड्यांवर 13,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 30,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस तसंच 9,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. या दोन मॉडेल्सव्यतिरिक्त इतर मॉडेल्सवर 5,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळणार आहेत. Mahindra Scorpio - महिंद्राच्या या गाडीमध्ये केवळ S5 वेरिएंटवर डिस्काउंट देण्यात येत आहे. 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि 5,000 कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे.10,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळणार आहेत.
Mahindra Bolero - या गाडीवर 6,500 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे Mahindra Marazzo - या कारच्या खरेदीदारास 15,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर 5 हजार रुपयांच्या ॲक्सेसरीजही मोफत मिळणार आहेत.
Mahindra XUV300 - महिंद्राच्या या गाडीवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वेरिएंटवर डिस्काउंट आहे. पेट्रोल गाडीच्या वेरिएंटवर 25,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस, 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. त्याचबरोबर डिझेल वेरिएंटवर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस, 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 6,550 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळणार आहेत. महिंद्रा Thar आणि महिंद्रा KUV100 NXT या दोन्ही गाड्यांवर कोणत्याही प्रकारचा डिस्काउंट मिळणार नाही.