नवी दिल्ली, 12 मे : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. खासगी किंवा सरकारी, लहान किंवा मोठ्या सर्वांसाठीच हे अत्यावश्यक कागदपत्र आहे. त्यामुळे आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवणं, काही बदल झाल्यास ते दुरुस्त करणं महत्त्वाचं आहे. तसंचं यासंबंधी सुविधा आपल्यापर्यंत पोहोचणंही गरजेचं आहे. अशात UIDAI चं mAadhaar अतिशय फायद्याचं ठरतं. या App मुळे एकाच ठिकाणी आधारसंबंधी 35 सुविधांचा फायदा घेता येतो. mAadhaar ओळखपत्र म्हणून एक वैध App असून याचा वापर देशातील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणी केला जाऊ शकतो. कोणताही असा व्यक्ती ज्याचं आधार कार्ड त्याच्या मोबाइल नंबरशी जोडलेलं आहे, तो या App वर आपलं आधार प्रोफाइल बनवू शकतो. mAadhaar App भारतात Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. mAadhaar App असं करा डाउनलोड - - सर्वात आधी mAadhaar डाउनलोड करा. महत्त्वाची बाब म्हणजे डाउनलोडआधी डेव्हलपरचं नाव भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आहे का हे तपासा. - App डाउनलोड झाल्यानंतर नियम, अटी, लँग्वेज, गाइडलाइन्स सेटिंग तपासा.
युजर्स mAadhaar App मधून ऑनलाइन फोनमधून आधार डाउनलोड, आधार कार्ड प्रिंट करू शकतात. अॅड्रेस अपडेट, ऑफलाइन eKYC, QR कोड स्कॅन, आधार वेरिफिकेशन, ईमेल वेरिफाय सह 35 हून अधिक सुविधांचा फायदा घेऊ शकतात. या App मध्ये युजर्सला Aadhaar Card Holder चं पर्सनल सेक्शन मिळेल, ज्यात आधार सर्विसचा फायदा घेता येईल. नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर युजरला आधार किंवा बायोमेट्रिक सर्टिफिकेशन लॉक-अनलॉक करण्याची संधी मिळेल. आधार लॉकिंगमध्ये आधार होल्डर आपला UID नंबर लॉक करू शकतात.
mAadhaar App मध्ये अधिकाधिक 5 प्रोफाइल जोडता येतात. यासाठी आधार कार्डशी संबंधीत सर्व डिटेल्स टाकावे लागतील त्यानंतर OTP द्यावा लागेल. एमआधार देशात कुठेही सहजपणे वापरता येतं. तसंच mAadhaar App एयरपोर्ट्स किंवा रेल्वे स्टेशनवर प्रुफ आयडी रुपात स्वीकारलं जातं.