नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : Aadhaar Card, PAN Card प्रमाणे Driving License ही अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. जर तुम्ही गाडी चालवत असाल, तर ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास किंवा हरवल्यास समस्या उद्धभू शकतात. परंतु यापासून वाचण्यासाठी डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढता येऊ शकतं. घरबसल्या सहजपणे हे काम करता येईल. Driving License हरवल्यास सर्वात आधी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करावी लागेल. ज्यावेळी डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय कराल, त्यावेळी FIR कॉपीची गरज लागेल. पण जर ड्रायव्हिंग लायसन्स अतिशय जुनं झालं असेल, फाटलं असेल, तर ओरिजनल Driving License कॉपी द्यावी लागेल. कसं कराल Online Driving License Apply - - सर्वात आधी रस्ते वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. - वेबसाइटवर जाऊन सर्व डिटेल्स भरल्यानंतर LLD फॉर्म भरा. - फॉर्म पूर्ण भरल्यानंतर प्रिंट आउट काढा. त्यानंतर सर्व आवश्यक डॉक्युमेंट अटॅच करा. - आता हा फॉर्म RTO ऑफिसमध्ये जमा करा. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर डुप्लीकेट Driving License मिळेल.
असा करा Offline अर्ज - सर्वात आधी RTO ऑफिसमध्ये जावं लागेल. इथे आवश्यक डॉक्युमेंट सब्मिट करावे लागतील. RTO ऑफिसमध्ये LLD फॉर्म भरावा लागेल आणि फी भरावी लागेल. या प्रोसेसमध्ये 30 दिवसांनंतर डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.
यावेळी एक रिसीटही मिळेल. ही रिसीट सांभाळून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळी डुप्लीकेट लायसन्स मिळेल, त्यावेळी रिसीटची गरज लागेल. या रिसीटद्वारे डुप्लीकेट Driving License ट्रॅक करता येऊ शकतं.