नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : आधार कार्ड (Aadhar card) आणि त्यासंबंधी सर्विस देणारी अथॉरिटी UIDAI ने गेल्या काही दिवसांपूर्वी नव्या PVC आधार कार्डची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती असल्याचं चित्र होतं. नव्या PVC आधार कार्डमुळे जुनं आधार कार्ड मान्य असणार की नाही याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र UIDAI ने ट्विट करत या स्पष्ट केलं की, PVC आधार कार्ड जारी झाल्यानंतर, जुनं आधार कार्ड अमान्य होणार नाही. त्याशिवाय UIDAI ने देशात तीन प्रकारचे आधार कार्ड मान्य राहणार असल्याची माहिती दिली आहे. PVC आधार कार्ड - UIDAI ने गेल्या काही दिवसांपूर्वी क्रेडिट आणि डेबिड कार्डप्रमाणे दिसणारं आधार कार्ड जारी केलं. हे आधार कार्ड जवळ बाळगण्यास सोपं असून टिकाऊ आहे आणि दिसायला आकर्षकही आहे. कोणताही व्यक्ती हे पॉलिविनाइल क्लोराइड कार्ड (PVC)बवनू शकतो. यासाठी 50 रुपये भरावे लागणार आहेत. तसंचहे लेटेस्ट सिक्योरिटी फिचर्ससह आहे. याच्या सिक्योरिटी फिचर्समध्ये hologram, Guilloche Pattern, ghost image आणि Microtextचा समावेश आहे. हे पीव्हीसी कार्ड एक प्रकारचं प्लास्टिक कार्ड आहे. तसंच हे वॉटर प्रुफही आहे. UIDAI वेबसाईट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in द्वारे ऑर्डर करता येणार आहे. हे आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे घरी डिलिव्हर होईल. आता ATM प्रमाणे होणार तुमचं आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आधार लेटर - UIDAI कडून पोस्टाने पाठवण्यात येणारं आधार कार्डही मान्य आहे. अनेकदा पोस्टाद्वारे येणारं आधार कार्ड पोस्ट करण्यास उशीर झाल्याने ते ग्राहकाकडे वेळेत पोहचत नाही. त्यामुळे UIDAI कडून नागरिकांना आधार कार्डची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात येते.
आता Aadhaar नंबरने काढता येणार पैसे; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रोसेस e-Aadhaar - ई-आधार UIDAI च्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येऊ शकतं. याची प्रिंट काढून कुठेही सरकारी ओळखपत्र म्हणून वापरता येऊ शकतं.