JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Jio ची बेस्ट ऑफर! 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार दुप्पट फायदा

Jio ची बेस्ट ऑफर! 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार दुप्पट फायदा

काय आहे हा प्लान आणि आपल्याला दुप्पट फायदा कसा मिळणार जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 मार्च : वोडाफोन-आयडिला आणि एअरटेलची प्रतिस्पर्धी असणारी jio कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वारंवार नव्या सुविधा लाँच करत असते. ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिक चांगला फायदा मिळावा आणि नवे ग्राहक आकर्षित व्हावेत यासाठी वेगवेगळे खिशाला परवडणारे प्लान देत आहे. जिओने अगदी 98 रुपयांच्या प्लानपासून ते 2020 पर्यंत अनेक प्लान आणले आहेत. जिओकडून 199 रुपयांच्या प्लानमध्ये एक बदल करण्यात आला आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे. जिओच्या ग्राहकांसाठी खरोखरच ही खूशखबर आहे. खिशाला परवडणाऱ्या प्लानमध्ये आता दुप्पट फायदा मिळणार आहे. काय आहे हा प्लान आणि आपल्याला दुप्पट फायदा कसा मिळणार जाणून घ्या. jio च्या या 199 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. एकूण 42 GB डेटा दर दिवसाला 1.5 GB डेटा आणि jio ते jio अनलिमिटेड कॉलिंग त्यासोबत इतर नेटवर्कसाठी एक हजार मिनिटं 100 SMSची सुविधा मिळणार आहे.

हे वाचा- अत्याधुनिक फीचर्सची मेड इन इंडिया बाइक - Kridn काय आहे किंमत आणि वैशिष्ट्य? Reliance Jio 98 Rupees plan शंभर रुपयांपेक्षा कमी असलेला हा प्लान ग्राहकांसाठी खास jio कंपनीकडून देण्यात आला आहे. यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणार आहे. 28 दिवसांसाठी ग्राहकांना 2 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय 300 SMS आणि जिओ ते जिओ अनलिमिडेट कॉलिंग फ्री मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 124 मिनिटं मिळणार आहेत. यासोबत ग्राहकांना जिओ अॅपचा मोफत लाभ घेता येणार आहे. सर्वसाधारण विचार करायचा झाला तर 129 प्लान हा सगळ्यात चांगला असं म्हणाय़ला हरकत नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला जिओ ते इतर नेटवर्कसाठी 1 हजार मिनिटं मिळतात. यासोबत महिन्याभरासाठी 300 SMS सोबत 2GB डेटाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरनेटसोबत कॉलिंगचा बेनिफिट मिळणार आहे हे वाचा- Airtelच्या ग्राहकांसाठी खुशखबर, या 3 नवीन प्लानमधून मिळणार जास्त फायदा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या