नवी दिल्ली, 27 एप्रिल : कोरोना व्हायरसचा कहर जगभरात सुरू आहे. या गंभीर परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क घालणं अनिवार्य आहे. मास्कचं आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो. मोबाईल फोनला असलेल्या फेस रिकग्नीशनमुळे मास्क घातल्यावर समस्या येऊ शकतात. परंतु आता तसं होणार नाही. अनेकदा मास्क घातल्यानंतर फोन अनलॉक (Face Unlock) करण्यासाठी चेहरा समोर आणता, परंतु मास्कमुळे चेहरा रिकग्ननाईज (Face recognition) होत नाही. मास्कमुळे फोन चेहरा डिटेक्ट करू शकत नाही आणि अनलॉक होत नाही. परंतु आता या समस्येपासून सुटका होऊ शकते. अॅपलने आपलं नवं अपडेट आयओएस 14.5 (iOS 14.5) लाँच केलं आहे, ज्यात आयफोन युजर्स (iPhone) अॅपल वॉचच्या साहय्याने आपलं डिव्हाईस अनलॉक करू शकतात. फ्री सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध - आयओएस अपडेटमुळे कोरोना काळात चेहऱ्यावर मास्क लावूनही फोनसह दुसरे अॅप्सही अनलॉक केले जाऊ शकतात. iOS 14.5 सह अनेक जबरदस्त फीचर्सही लाँच केले गेले आहेत. अॅपलने सोमवारी सांगितलं, की आयओएस 14.5 आता एक फ्री सॉफ्टवेअर अपडेट म्हणून उपलब्ध आहे.
तसंच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हातात अॅपल वॉच घातल्यानंतरही फोन अनलॉक केला जाऊ शकतो. त्यासाठी केवळ फोनजवळ जावून त्याकडे एकदा फक्त पाहावं लागेल. त्यानंतर युजर्सला अॅपल वॉचकडून एक फीडबॅक मिळेल, ज्याद्वारे फोन अनलॉक झाल्याचं समजेल. नवं फीचर सध्या आयफोन एक्समध्ये उपलब्ध आहे, जे येणाऱ्या काही दिवसांत अॅपल वॉच सीरीज 3 आणि त्यानंतर इतर डिव्हाईसमध्ये लाँच केलं जाईल.