JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Instagram मध्ये होणार हे 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

Instagram मध्ये होणार हे 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) असलेल्या ‘इन्स्टाग्राम’ची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मेटाच्या मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म या वर्षी युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स (Instagram new Features) घेऊन येत आहे.

जाहिरात

इथे Temporarily Deactivate My Account चा पर्याय दिसेल. इथे पासवर्ड विचारला जाईल. कारणही विचारलं जाईल, तिथे Temporarily Deactivate My Account सिलेक्ट करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 फेब्रुवारी: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) असलेल्या ‘इन्स्टाग्राम’ची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मेटाच्या मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म या वर्षी युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स (Instagram new Features) घेऊन येत आहे. हे फीचर्ज युजर्सना अधिक चांगला एक्सपिरियन्स देतील. याशिवाय हा प्लॅटफॉर्म अधिक युजर फ्रेंडलीआणि सुरक्षितदेखील बनवतील, असं म्हटलं जातं आहे. इन्स्टाग्राममुळं किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्यास (Mental Health) हानी पोहोच असल्याचे आरोप गेल्या वर्षी झाले होते. त्यामुळं, या वर्षी इन्स्टाग्रामनं क्रोनोलॉजिकल फीड (Chronological Feed) किंवा आपल्या फीडमधील पोस्ट रिअरेंज करण्याच्या सुविधेसह अनेक नवीन फीचर्स आणण्याचा विचार केला आहे. हे फीचर्स काय असणार आहेत याबाबत आपण जाणून घेऊया: 1. क्रोनोलॉजिकल ऑर्डर फीड - इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी सांगितलं की, कंपनी युजर्ससाठी क्रोनोलॉजिकल फीड हे फीचर परत आणणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला क्रोनोलॉजिकल फीडची सुविधा युजर्सला मिळणार असल्याची घोषणा मोसेरी यांनी केली आहे. या फीचरमुळं युजर्स आपल्या फीडमध्ये काय दाखवायचं याची निवड करू शकतील. यापूर्वी मोसेरी यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, होम (Home), फेवरेट्स (Favourites) आणि फॉलोइंग (Following) असे तीन सॉर्टिंग ऑप्शन्स युजर्सकडे असतील. ‘होम’ हे सध्याचे सेटअप आहे जेथे युजर्स त्यांच्या आवडीनुसार आणि वागणुकीनुसार रिलेव्हन्ट पोस्ट पाहतात. एआयनं (AI) याची अंमलबजावणी केली आहे. ‘फेवरेट्स’ सेटिंगमध्ये तुम्हाला फक्त तुम्ही फेवरेट्स म्हणून मार्क केलेल्या अकाऊंटवरील पोस्टस् दिसतील. यामुळं युजर्सला अनावश्यक पोस्ट फिल्टर (Post Filter) करण्याची सुविधा मिळणार आहे. ‘फॉलोइंग’ या सेंटिंगमध्ये पोस्टची क्रोनोलॉजी लावता येणार आहे. हे फीचर इन्स्टाग्रामच्या एकदम सुरुवातीच्या काळातही उपलब्ध होतं. तेच फीचर पुन्हा एनेबल करण्याचा विचार कंपनी करत आहे. हे वाचा- Voter List मध्ये तुमचं नाव आहे की नाही? घरबसल्या असं तपासा, पाहा प्रोसेस 2. फीडमध्ये पोस्ट्स रिअरेंज करा - इन्स्टाग्राम आणखी एका नवीन फीचरवर काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. या फीचरमुळं युजर्सला त्यांचे प्रोफाइल ग्रिड (Profile Grid) एडिट करता येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास युजर त्यांच्या पोस्ट पाहिजे तशा रिअरेंज (Rearrange) करू शकतील. सध्या सर्व पोस्ट तारखेनुसार अरेंज होतात. गेल्या महिन्यात, अलेस्सांद्रो पलुझी (Alessandro Paluzzi) या रिव्हर्स इंजिनियरनं (Reverse Engineer) या फीचरचे दोन स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले होते. पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये ‘एडिट प्रोफाइल’ पेज दिसत असून त्यात नवीन ‘एडिट ग्रिड’ (Edit Grid) ऑप्शन दिसत आहे. या नवीन ऑप्शनवर टॅप केल्यास एक नवीन विंडो ओपन होईल. ही विंडो युजर्सला त्यांची प्रोफाइल ग्रिड दाखवते, असं दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. 3. स्टोरीसाठी मिळणार 3D अवतार इन्स्टाग्रामची पेरेंट कंपनी मेटा सध्या मेटाव्हर्सची (Metaverse) अंमलबजावणी करण्यात व्यस्त आहे. मेटानं इन्स्टाग्रामवर देखील डिरेक्ट मेसेजेस आणि स्टोरीजसाठी 3D अवतार सादर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय फेसबुक (Facebook) आणि मेसेंजरमध्येसुद्धा (Messenger) सध्याचे अवतार अपडेट करण्याचं काम सुरू आहे. इन्स्टाग्रामवरील नवीन 3D अवतार हे मेटाव्हर्सच्या प्रसिद्धीसाठी कंपनीचं पहिले पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. हे नवीन 3D अवतार केवळ यूएस, कॅनडा आणि मेक्सिकोमधील युजर्ससाठी लाँच केले गेले आहेत. हे अवतार स्टिकर्स, फीड पोस्ट, फेसबुक प्रोफाइल पिक्चर्स आणि मेटाच्या प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिसेसवर लोकांचं अॅपियरन्स म्हणून दिसतील. 3D अवतारांमध्ये चेहऱ्यांचे नवीन आकार आणि इम्प्लांट, श्रवण यंत्र, व्हीलचेअर आणि दिव्यांग युजर्ससाठी सहाय्यक उपकरणं पुरवली जातील, या महिन्याच्या सुरुवातीला एका ब्लॉग पोस्टमध्ये अशी माहिती इन्स्टाग्रामनं दिली होती. हे वाचा- आता रुग्णालयातही बनणार Aadhaar Card, मराठी भाषेत देखील असणार आधार कार्डवर माहिती 4. फोलोअर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन इन्स्टाग्राम युजर्सला त्यांच्या आवडत्या इन्फ्ल्युएन्सरच्या एक्स्लुसिव्ह कंटेटसाठी(exclusive content) सब्सक्रिप्शन मिळवता येणार आहे. सर्वात अगोदर युनायटेड स्टेट्समध्ये (United States) लाँच होणारे हे फीचर आजपासून टेस्टिंग फेजमध्ये लाँच केलं आहे. कंपनीनं गेल्या (जानेवारी) महिन्यात एका ब्लॉग पोस्टमध्ये या नवीन फीचरची घोषणा केली होती. क्रिएटर्स सध्या मर्यादित लोकांचा वापर करून या फीचरची टेस्टिंग करत आहेत. सुरुवातीला, फक्त 10 क्रिएटर्स टेस्टिंगचा भाग आहेत. ज्यात बास्केटबॉल खेळाडू, एक ऑलिम्पियन, एक ज्योतिषी आणि इतर काही लोकांचा समावेश आहे. येत्या काही दिवसात यामध्ये अधिक इन्फ्ल्युएन्सर्स जोडले जातील, अशी माहिती देण्यात आली होती. 5. प्रोफाईड एम्बेड्स - इन्स्टाग्राम प्रोफाइल एम्बेड (Profile Embed feature) या नवीन फीचरची घोषणा इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी ट्विटर पोस्टमध्ये केली. ते म्हणाले होते की, एक पोस्ट आणि व्हिडिओ एम्बेड करण्याच्या क्षमतेव्यतिरिक्त, युजर्स त्यांच्या प्रोफाइलचे मिनीएचर व्हर्जन्ससुद्धा एम्बेड करू शकतील. हे फीचर लोकांना तुमच्या प्रोफाइलची झलक पाहण्याची परवानगी देईल. सध्या फक्त यूएसमध्ये हे फीचर उपलब्ध आहे. हे फीचर क्रिएटर्स, ब्रँड आणि इतर व्यवसायांना त्यांचं इन्स्टाग्राम पेज थर्ड पार्टी वेबसाइटवर हायलाइट करण्यात मदत करतं, असं सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या