JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / बम्पर ऑफर, 9 हजारांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 550 रुपयांना, इकडे करा बूक

बम्पर ऑफर, 9 हजारांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 550 रुपयांना, इकडे करा बूक

ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांना भरपूर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतो. त्यामुळे ऑनलाइन स्मार्टफोन खरेदीकडे अनेकांचा कल असतो.

जाहिरात

9 हजारांचा स्मार्टफोन फक्त 550 रुपयांमध्ये

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जून : ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांना भरपूर ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतो. त्यामुळे ऑनलाइन स्मार्टफोन खरेदीकडे अनेकांचा कल असतो. खास फीचर्स असलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या इन्फिनिक्स कंपनीचा एक स्मार्टफोन जोरदार चर्चेत आहे. फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास एक्स्चेंज ऑफर आणि भरघोस डिस्काउंट मिळू शकतो. 9000 रुपयांचा हा फोन एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही केवळ 500 रुपयांत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन कोणता, त्यात कोणती फीचर्स आहेत आणि या फोनच्या खरेदीसाठी फ्लिपकार्टवर कोणत्या ऑफर्स आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या. इन्फिनिक्स हॉट 30i हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. या फोनचं डिझाइन आकर्षक आणि सुंदर आहे. या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स खास आहेत. इन्फिनिक्स हॉट 30i स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक G37 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 6.6 इंच आकाराचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 128 GB स्टोरेज सुविधा देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप असून 50 MPची प्रायमरी लेन्स आहे. सेल्फीसाठी फ्लॅशसह 5MP चा सेन्सर आहे. फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 8 GB रॅम आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 8999 रुपये आहे. इन्फिनिक्स हॉट 30i हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनची एमआरपी 11,999 रुपये आहे; पण यावर सध्या 25 टक्के डिस्काउंट आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही 8999 रुपयांत ऑर्डर करू शकता. तसंच यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के सूट मिळू शकते. यावर तुम्हाला 750 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. एक्स्चेंज ऑफरनुसार वेगळा डिस्काउंटदेखील मिळत आहे. तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केला तर तुम्हाला त्या बदल्यात 8450 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कंपनीकडून या नव्या स्मार्टफोनवर एका वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय अ‍ॅक्सेसरीजवर सहा महिन्यांची वॉरंटीही दिली जात आहे. फ्लिपकार्टवर आज इन्फिनिक्सचा हा स्मार्टफोन ऑर्डर केला तर उद्या घरी या फोनची डिलिव्हरी मिळेल. इन्फिनिक्स हॉट 30i या स्मार्टफोनची फीचर्स आणि ऑनलाइन खरेदीवर मिळणारा डिस्काउंट आणि ऑफर्स पाहता हा चांगला पर्याय ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या