JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लॉकडाऊनमध्येच कीबोर्ड खराब झालाय? माउसच्या मदतीने असं करा टाईप, पाहा जबरदस्त ट्रिक

लॉकडाऊनमध्येच कीबोर्ड खराब झालाय? माउसच्या मदतीने असं करा टाईप, पाहा जबरदस्त ट्रिक

कीबोर्ड खराब झाला, तर सगळं काम ठप्प होतं. कारण तुम्ही काही टाईप करू शकत नाही. पण घाबरण्याचं कारण नाही. कारण यावरचा उपाय आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्येच उपलब्ध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 मे : सध्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Corona Virus pandemic) लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह ऑनलाइन काम करणारे अनेक लोक घरी बसून काम (Work From Home) करत आहेत. अगदी शाळा, कॉलेजातील मुलंदेखील घरी बसून ऑनलाइन शिकत आहेत. त्यामुळे डिजिटल उपकरणांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, वेब कॅमेरे आणि टॅबलेट अशा डिजिटल उपकरणांच्या मागणीत झपाट्यानं वाढ झाली आहे. त्याचवेळी कीबोर्ड, माउस आदी उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास दुकानं बंद असल्यानं त्याची दुरुस्ती तत्काळ होणं शक्य होत नाही. जास्तीचं उपकरण प्रत्येकाकडे असणंही शक्य नाही. त्यामुळे अशी अडचण आल्यास काम रखडू शकतं. त्यामुळं काही पर्यायी उपाययोजना माहित असणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाची अडचण येऊ शकते ती कीबोर्डची. कीबोर्ड खराब झाला, तर सगळं काम ठप्प होतं. कारण तुम्ही काही टाईप करू शकत नाही. पण घाबरण्याचं कारण नाही. कारण यावरचा उपाय आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्येच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यासाठी कुठे बाहेर जाण्याची किंवा कोणाला बोलावण्याची किंवा काही आणण्याची गरज नाही. तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा कीबोर्ड (Keyboard) खराब झाला असेल किंवा नीट काम करत नसेल, तर तुम्ही ऑन स्क्रीन कीबोर्ड (On Screen Key Board) वापरू शकता. ऑन स्क्रीन कीबोर्ड सामान्य कीबोर्डप्रमाणेच काम करतो आणि तो वापरणंही अतिशय सोपं आहे. कीबोर्ड खराब झाल्यास तुम्ही एक्स्टेंशनच्या (Extension) मदतीनं बोलूनदेखील टाइप (Voice to Type) करु शकता.

(वाचा -  कोरोना लशीसाठी तुम्ही ज्या Cowinवर नोंदणी करताय ते फेक नाही ना? अशी ओळखा Website )

तुम्हाला ऑन स्क्रीन कीबोर्ड वापरायचा असेल तर - - सर्वांत आधी ऑन स्क्रीन कीबोर्ड उघडण्यासाठी स्टार्ट बटणावर (Start) क्लिक करा. - स्टार्टवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्ज ऑप्शनवर (Settings) क्लिक करा. - इथं अनेक पर्याय समोर दिसतील. त्यातील Ease of Access वर (इझ ऑफ अॅक्सेस) क्लिक करा. - आता तुम्हाला स्क्रीन कीबोर्डचा (Screen Key board) पर्याय दिसेल. - स्क्रीन कीबोर्डवर क्लिक केल्यास कीबोर्ड तुमच्या स्क्रीनवर येईल. - त्यानंतर तुम्ही माउसच्या मदतीनं ऑन-स्क्रीन कीबोर्ड वापरू शकता.

(वाचा -  लॉकडाउनमध्येच Aadhaar Card हरवलं? कुठेही न जाता घरबसल्या असं बनवा नवं आधार कार्ड )

बोलून टाइप करणं - तुम्हाला ऑन स्क्रीन कीबोर्ड वापरणं आवडत नसेल, तर तुम्ही बोलून टाइप होण्याची सुविधाही वापरू शकता. यासाठी, गुगल क्रोम (Google Chrome) ब्राउझरमधून Voice Note II - Speech to text एक्सटेंशन डाउनलोड करावं लागेल. यानंतर तुम्ही जे काही बोलता ते टाईप केलं जाईल. दरम्यान, डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, वेब कॅमेरे आणि टॅबलेट अशा डिजिटल उपकरणांच्या विक्रीत वाढ झाल्यानं यांच्या किंमतींमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या