JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / LPG Gas Cylinder Subsidy पुन्हा कशी मिळवाल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

LPG Gas Cylinder Subsidy पुन्हा कशी मिळवाल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

चुकून LPG सबसिडी सोडली असेल आणि आता पुन्हा सबसिडी मिळवायची असल्यास, ऑईल मार्केटिंग कंपन्या एलपीजी सबसिडी पुन्हा मिळवण्यासाठीही सुविधा देतात.

जाहिरात

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी एक कपडा पाण्यात भिजवून ओला करुन घ्या. या ओल्या कपड्याने सिलेंडरवर एक मोठी रेष ओढा. त्यानंतर 10 मिनिटं वाट पाहा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मे: घरगुती गॅस सिलेंडरवर सरकार ग्राहकांना सबसिडी देते. यात एखाद्या ग्राहकाला सबसिडी नको असल्यास तसाही पर्याय असून ग्राहक त्याला मिळणारी सबसिडी (LPG subsidy) सोडू शकतो. सरकारने यासाठी ‘गिव इट अप’ ही सुविधाही सुरू केली आहे. परंतु तुम्ही या अंतर्गत चुकून LPG सबसिडी सोडली असेल आणि आता पुन्हा सबसिडी मिळवायची असल्यास, ऑईल मार्केटिंग कंपन्या एलपीजी सबसिडी पुन्हा मिळवण्यासाठीही सुविधा देतात. सरकारने एलपीजी ग्राहकांना गॅस सबसिडीचा थेट फायदा देण्यासाठी, ग्राहकांचं गॅस कनेक्शन बँक आणि आधार कार्डशी लिंक केलं होतं. त्याशिवाय सबसिडी सोडण्यासाठी देशभरात गिव इट अप अभियान चालवण्यात आलं होतं. या अभियानांतर्गत असे एलपीजी ग्राहक, ज्यांना विना सबसिडीवाला सिलेंडर परवडतो, त्यांना सबसिडी सोडण्याची विनंती केली होती, जेणेकरुन गरजूंना याचा लाभ मिळू शकेल. पुन्हा सबसिडी कशी सुरू कराल - LPG सबसिडी पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकांना आपल्या गॅस एजेन्सीकडे एक अर्ज द्यावा लागेल. या अर्जासह आयडी प्रुफ, अॅड्रेस प्रुफ, गॅस कनेक्शनची कागदपत्र आणि इनकम प्रुफची एक कॉपी द्यावी लागेल. सबसिडी मिळवण्यासाठी वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा याहून कमी असावं लागतं. गॅस एजेन्सी ग्राहकाकडून एक फॉर्म भरुन घेईल, त्यानंतर एजेन्सीकडून चौकशी केली जाईल आणि एका आठवड्याच्या आत सबसिडी दिली जाईल.

(वाचा -  LPG Gas Cylinder Subsidy Status: तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येते का? असं तपासा )

ग्राहक आपल्या एलपीजी सबसिडीबाबत गॅस डीलरशिप किंवा गॅस एजेन्सीशी संपर्क करू शकतात. ग्राहकाला आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण प्रोसेसची माहिती दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या