नवी दिल्ली,15 जुलै : कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडची (Online Fraud) अनेक प्रकरणं समोर आली आहेत. फ्रॉडस्टर्स, हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत आहेत. हॅकर्स (Hackers) कधी, कोणाचं अकाउंट हॅक करतील हे सांगणं कठीण आहे. अशात आपण केवळ आपल्या अकाउंटची सुरक्षा वाढवू शकतो. हॅकिंग रोखण्यासाठी Google Account सिक्योर असणं अतिशय आवश्यक आहे. Google अकाउंटवरुन सोशल मीडिया अकाउंट बनवल्यास किंवा Google अकाउंट्स कोणत्याही वेबसाईटवर लॉगइन केल्यास, Google अकाउंट हॅक होण्यासह सोशल मीडिया अकाउंट्सही (Social Media Account) हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. Google Account सिक्योरिटी चेकअप - गुगल अकाउंट सिक्योर (Google Account Security) ठेवण्यासाठी रेग्युलर बेसिसवर Google अकाउंटची सिक्योरिटी चेकअप करणं गरजेचं आहे. हे सिक्योरिटी चेकअप, सिक्योरिटी चेकअप टूलच्या मदतीने आपल्या स्मार्टफोन, कंप्यूटर, लॅपटॉप आणि टॅबलेटमध्ये करू शकतात. Google अकाउंटसाठी मजबूत पासवर्ड (Password) ठेवणंही आवश्यक आहे. हा पासवर्ड युजर्स स्वत: ठेवू शकतात किंवा Google कडून सुचवलेल्या पासवर्डचा वापर करू शकता. गुगलकडून सांगितलेला पासवर्ड अधिक कठीण असतो त्यामुळे तो लक्षात ठेवणंही कठीण ठरतं. परंतु हा पासवर्ड सेव्ह करून ठेवता येतो. अशात कोणी पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर युजरला याबाबत एक अलर्ट मेसेजही येईल.
Google Account अधिक सुरक्षित करण्यासाठी गुगल अकाउंटमध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन (Two-step Verification) इनेबल करणं गरजेचं आहे. यामुळे जेव्हा कधी एखाद्या दुसऱ्या डिव्हाईसवर युजरचं लॉगइन केलं जाईल, त्यावेळी युजरला याबाबत एक अलर्ट मेसेजही पाठवला जाईल.