JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर मेसेज चुकून डिलीट झाला? असा मिळेल परत, पाहा काय आहे प्रोसेस

WhatsApp वर मेसेज चुकून डिलीट झाला? असा मिळेल परत, पाहा काय आहे प्रोसेस

WhatsApp वर चुकून तुम्ही पाठवलेला मेसेज ‘डिलीट फॉर मी’ (Delete For Me) केला जातो. अशावेळी एका सोप्या ट्रिकने मेसेज रिट्रीव करता येऊ शकतात.

जाहिरात

कनेक्ट करण्यासाठी अकाउंट सिलेक्ट करा आणि Done वर क्लिक करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मार्च : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, ऑडिओ, फाइल्स, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल अशा अनेक गोष्टी मिळतात. WhatsApp वर चुकून तुम्ही पाठवलेला मेसेज ‘डिलीट फॉर मी’ (Delete For Me) केला जातो. अशात मेसेज केवळ तुमच्यासाठी डिलीट होतो आणि इतर जण तो पाहू शकतात. अशावेळी एका सोप्या ट्रिकने मेसेज रिट्रीव करता येऊ शकतात.

हे वाचा -  विना Internet ही करता येईल WhatsApp Chat, करावं लागेल हे एक काम

मेसेज असे करा रिकव्हर - एखादा मेसेज चुकून डिलीट झाला तर तुम्ही तो क्लाउडच्या (Cloud) मदतीने रिकव्हर करू शकतात. WhatsApp तुमच्या सर्व मेसेज आणि चॅटचा बॅकअप (WhatsApp Backup) ठेवतो. हा बॅकअप क्लाउडमध्ये सेव्ह होतो. Default मध्ये रात्री 2 ते 4 वाजता बॅकअप ठेवला जातो. यावेळी WhatsApp चा वापर कमी होत असल्याने हा वेळ Default मध्ये ठेवला जातो. अशात WhatsApp चा अॅक्सेस गेल्यास तुम्हाला क्लाउडमधील बॅकअपद्वारे संपूर्ण डेटा परत मिळवता येतो.

हे वाचा -  …तर तुमचं Driving License लगेच करा अपडेट;अन्यथा होईल मोठं नुकसान,नवे आदेश जारी

असा करा रिट्रीव - तुमच्याकडे क्लाउडमध्ये हा बॅकअप सेव्ह नसेल, तरीही दुसऱ्या ठिकाणी WhatsApp बॅकअप परत मिळवता येतो. यासाठी अँड्रॉइड (Android) फोनच्या फाइल मॅनेजरमध्ये (File Manager) जावं लागेल. इथे अँड्रॉइड फोल्डर (Android Folder) सर्च करा. इथे WhatsApp नावाचं फोल्डर दिसेल. इथे बॅकअप फोल्डरचं नाव ‘msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12’ वरुन बदलून ‘msgstore.db.crypt12’ करा. अशाप्रकारे ज्या दिवसापर्यंतचे मेसेज आणि चॅट हवे आहेत, ते रिस्टोर होतील. अशा दोन्ही प्रकारे तुमचे मेसेज पुन्हा मिळवू शकता.

हे वाचा -  WhatsApp वर पार्टनर कोणासोबत करतोय Chat, एका मिनिटांत असं शोधा

दरम्यान, एक अशी ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही इंटरनेट नसतानाही WhatsApp चा वापर करू शकाल.  विना इंटरनेट WhatsApp वापरण्यासाठी तुमच्या असलेल्या सीम कार्डशिवाय आणखी एका Sim Card ची गरज लागेल. या सीम कार्डच्या मदतीने विना इंटरनेट WhatsApp वापरता येईल. यासाठी तुमच्या फोनमध्ये वायफाय, इंटरनेट डेटा (Wi-Fi, Internet Data) असण्याचीही गरज नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या