JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / विना Internet ही करता येईल WhatsApp Chat, करावं लागेल हे एक काम

विना Internet ही करता येईल WhatsApp Chat, करावं लागेल हे एक काम

एक अशी ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही इंटरनेट नसतानाही WhatsApp चा वापर करू शकाल, WhatsApp Chat करू (WhatsApp Chat Without Internet) शकाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 मार्च : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp वापरण्यासाठी इंटरनेट (Internet) असावं लागतं. अनेकदा इंटरनेट-Wifi चालत नसेल किंवा नेटवर्क नसेल तर अनेक Apps सह WhatsApp ही काम करणं बंद करतं. परंतु एक अशी ट्रिक आहे ज्याद्वारे तुम्ही इंटरनेट नसतानाही WhatsApp चा वापर करू शकाल, WhatsApp Chat करू (WhatsApp Chat Without Internet) शकाल. विना इंटरनेट WhatsApp वापरणं अशक्य वाटत असेल तर हा समज चुकीचं ठरू शकतो. विना इंटरनेट WhatsApp वापरण्यासाठी तुमच्या असलेल्या सीम कार्डशिवाय आणखी एका Sim Card ची गरज लागेल. या सीम कार्डच्या मदतीने विना इंटरनेट WhatsApp वापरता येईल. यासाठी तुमच्या फोनमध्ये वायफाय, इंटरनेट डेटा (Wi-Fi, Internet Data) असण्याचीही गरज नाही.

हे वाचा -  WhatsApp वर पार्टनर कोणासोबत करतोय Chat, एका मिनिटांत असं शोधा

विना इंटरनेट WhatsApp वापरण्यासाठी चॅटसीम (ChatSim) नावाचं खास सीम ही सुविधा देतं. हे सीम कार्ड खरेदी करणंही अतिशय सोपं आहे. चॅटसीम ऑनलाइन कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी करता येईल. तसंच चॅटसीमच्या वेबसाइटवरुनही हे ऑर्डर करता येऊ शकतं.

हे वाचा -  Android युजर्स सावधान, Google Play Storeवर मालवेयरचा धोका,बँकिंग डिटेल्स धोक्यात

काय आहे ChatSim Card - या सीम कार्डची किंमत सर्वसाधारण सीम कार्डपेक्षा अधिक आहे. परंतु याचा फायदाही आहे. जर तुम्ही या सीम कार्डचा वापर करत असाल, तर तुम्हाला WhatsApp वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज लागणार नाही. तसंच हे सीम कार्ड भारतासह देश-विदेशातही वापरता येतं. हे चॅटसीम खरेदी केल्यापासून पुढे वर्षभर वापरता येतं. त्यानंतर ते रिचार्ज करावं लागतं. ChatSim कार्ड 1800 रुपयांत खरेदी करता येतं. या सीम कार्डला एक वर्षाची वॅलिडिटी मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या