नवी दिल्ली, 12 जुलै : ट्रेनने कुठेही जाण्या-येण्यासाठी ऑनलाईन किंवा काउंटरवर तिकीट बुक करावं लागतं. परंतु काउंटरवर तिकीट बुक करण्याच्या तुलनेत ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याचे अधिक फायदे आहेत. कारण ऑनलाईन खरेदी केलेलं तिकीट हवं तेव्हा कॅन्सल करता येतं. तसंच बुकिंगचे अपडेटही घेता येतात. तर काउंटवर खरेदी केलेलं तिकीट कॅन्सल करण्यासाठी काहीशा अडचणी येतात. त्यामुळे काउंटरवर खरेदी केलेलं तिकीट ऑनलाईन माध्यमातून कसं कॅन्सल करता येईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कसं कॅन्सल कराल तिकीट? - सर्वात आधी https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf वर क्लिक करा. - सर्वात वर कॅन्सलेशन ऑप्शन सिलेक्ट करा. - नियम वाचून चेक बॉक्सवर क्लिक करा. - डिटेल्स भरल्यानंतर ओटीपी विचारला जाईल. हा ओटीपी त्या मोबाईल नंबरवर येईल, जो तुम्ही काउंटरवर तिकीट बुक करताना दिला होता. - ओटीपीनंतर PNR डिटेल्स येतील. - हे डिटेल्स वेरिफाय करुन ‘Cancel Ticket’ वर क्लिक करा. त्यानंतर रिफंड अमाउंट स्क्रीनवर दिसेल. - PNR आणि रिफंड डिटेल्स पाठवले जातील.
कसं मिळेल रिफंड? ज्यावेळी युजर रेल्वेला ऑनलाईनद्वारे तिकीट कॅन्सल रिक्वेस्ट पाठवेल, त्यावेळी एक मेसेज येईल. या मेसेजमध्ये रक्कम कलेक्ट करण्यासाठी जवळच्या रेल्वे स्टेशनची माहिती दिली जाईल. कॅन्सलेशनचे पैसे वेळेनुसार ठरतात. जर प्रवासाच्या अनेक दिवस आधी तिकीट कॅन्सल केलं, तर पूर्ण पैसे परत मिळतात. परंतु उशिरा कॅन्सल केल्यास, अधिक बुकिंग फीस कट होऊ शकते. जर तिकीट कन्फर्म असेल, तर ट्रेन निघण्याच्या चार तास आधीदेखील तिकीट ऑनलाईनद्वारे कॅन्सल केलं जाऊ शकतं.