JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Mirzapur पाहण्यासाठी उत्सुक आहात? या सोप्या स्टेप्स वापरून व्हा Amazon Prime मेंबर

Mirzapur पाहण्यासाठी उत्सुक आहात? या सोप्या स्टेप्स वापरून व्हा Amazon Prime मेंबर

Amazon प्राइम मेंबर झाल्यावर, प्राइम व्हिडिओ आणि Amazon म्युझिक या सेवाही वापरता येतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑक्टोबर : Amazon प्राइम मेंबर होण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे अनेक डीलमध्ये सवलत आणि पाहिलं प्राधान्य दिलं जातं. या सोबतच Amazon प्राइम व्हिडिओ आणि Amazon म्युझिक या सेवाही वापरता येतात. Amazon वर खरेदीमध्ये फ्री होम डिलिव्हरीची सुविधा आहे. याचे सदस्य होण्यासाठी दरमहा 129 रुपये किंवा वार्षिक 999 रुपये अशी मेंबरशीप फी अमेझॉन घेतं. ही सदस्यता घेण्यापूर्वी 30 दिवसांसाठी मोफत प्राइम सदस्यतेची ट्रायल सुद्धा वापरून पाहता येते आणि त्या नंतर इच्छा असल्यास पुढील सदस्यतेचा निर्णय घेता येऊ शकतो. Whatsapp chat कसं लीक होतं? जाणून घ्या कसं कराल कायमस्वरुपी डिलिट जर Amazon Prime member व्हायचं असेल तर चार सोपे टप्पे आहेत - - Amazon वेबसाइट किंवा आपल्या Android किंवा iOS डिव्हाइसवर Amazon app डाउनलोड करा. - फोनमधील ऍपवर डावीकडील वरच्या बाजूला असलेल्या मेनूवर जा. त्यानंतर “ट्राय प्राइम” क्लिक करा. वेबसाइटवर उजव्या वरच्या कोपऱ्यात “ट्राय प्राइम” निवडा. NASA: आता चंद्रावरही 4G नेटवर्क; मिळणार हायस्पीड इंटरनेट - “दरमहा 129 रुपयांत प्राइम जॉइन करा” किंवा “वार्षिक 999 रुपयात प्राइम जॉइन करा” यापैकी निवड करा. - आता पेमेंट प्रक्रियेस पुढे जाऊ शकता आणि ते पूर्ण झालं की प्राइम मेंबर झालात. Amazon प्राइम मेंबर झाल्यावर Amazon प्राइम व्हिडिओवरील ओरिजनल शो आणि चित्रपटांचा आनंद घेऊ शकतो. शॉपिंग डीलमध्ये प्रथम प्राधान्य, शॉपिंगवर कित्येक खास सवलती आणि कोणतीही डिलिव्हरी फी नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या